सिंधुदुर्ग : आम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:00 PM2018-03-07T15:00:10+5:302018-03-07T15:00:10+5:30

वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

Sindhudurg: We have a spontaneous response to the program of Vaibhavavidikar artists | सिंधुदुर्ग : आम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आम्ही वैभववाडीकर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.

Next
ठळक मुद्देआम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद विकासासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : नीतेश राणे

वैभववाडी : वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

आम्ही वैभववाडीकर आयोजित महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम येथील पृथ्वीराज पॅलेसच्या रंगमंचावर झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.



यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, उपनगराध्यक्षा संपदा राणे, बांधकाम सभापती समिता कुडाळकर, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, मुंबईचे माजी नगरसेवक अजित रावराणे, उद्योजक विकास काटे, बाप्पी मांजरेकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, नगरसेविक रवींद्र तांबे, अक्षता जैतापकर, सुनील रावराणे, आम्ही वैभववाडीकर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष महेश रावराणे, मंगेश कदम, संतोष टक्के, रणजित तावडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक महेश रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन संजीवनी पाटील व संतोष टक्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश कदम, संतोष टक्के, संजय लोके, महेश रावराणे, विद्याधर सावंत, अंकुश जाधव, मुकुंद रावराणे, सचिन सावंत, सुधाकर रावराणे, उज्ज्वल नारकर, ओंकार कदम, संजीवनी पाटील, निलोफर शेख, शितल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सांस्कृतिक परंपरेचे दर्शन

स्थानिक कलाकारांनी मराठमोळ्या वेशभूषेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. यामध्ये कोळीगीत, वारकरी दिंडी, गोंधळ, मंगळागौर, भजन, झिम्मा फुगडी, आदिवासी नृत्य यांसारखे बहारदार कार्यक्रम सादर केले. तसेच शिवचरित्ररुपी नाटिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून संभाजी राजेंच्या वधापर्यंतचा संपूर्ण ऐतिहासिक कालखंड हुबेहूब साकारला. ही ऐतिहासिक नाटिका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.


 

Web Title: Sindhudurg: We have a spontaneous response to the program of Vaibhavavidikar artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.