सिंधुदुर्ग: इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का..? : निलेश राणेंच्या वक्तव्यावर केसरकर यांचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:08 PM2018-12-03T13:08:52+5:302018-12-03T13:12:54+5:30
चिपी विमानतळावर धावणारी रिक्षा खरी आहे, त्या ठीकाणी इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का असे प्रत्युत्तर दिले.
सावंतवाडी : चिपी विमानतळावर धावणारी रिक्षा खरी आहे, त्या ठीकाणी इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का असे प्रत्युत्तर दिले.
विमानतळावर रिक्षा फिरत असल्याची क्लीप माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी व्हायरल केली होती, याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. राणे टोकाला जावून बोलले तरी आपण तसे बोलणार नाही असे त्यांनी सांगितले. आपल्याला सी वर्ल्ड प्रकल्प करायचा आहे. वर्षंभरात ते काम सुरू होईल, परंतू राणे नेहमी प्रमाणे विरोध करतील म्हणून आपण नियोजीत जागा सांगणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले.