सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबवणार : विकास खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:34 PM2018-06-20T14:34:33+5:302018-06-20T14:34:33+5:30

कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत.

Sindhudurg: Will be implementing elephants to campaign in Dodamarg taluka: Vikas Kharge | सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबवणार : विकास खरगे

मुंबई येथे माजी आमदार राजन तेली यांनी वनसचिव खरगे यांची भेट घेतली.

Next
ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबवणार : विकास खरगेराजन तेली यांनी घेतली वनसचिवांची भेट

सावंतवाडी : कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत.

माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यानंतर वनसचिवांसोबत झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. हत्तीबाधितांना वाढीव नुकसान भरपाईही देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व हत्तींचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला. तसेच दोडामार्ग येथे हत्तींपासून होणारी नुकसानी तत्काळ थांबवली जावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्याची माहितीही वनमंत्री यांना दिली. त्यानंतर वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार वनसचिव खरगे यांनी बैठक घेतली.

या चर्चेत हत्तींपासून होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त झालेल्या हेवाळे-घाटीवडे व बांबर्डे भागातील लोकांकडून आंदोलन करण्यात आले होते. यात हत्तींपासून होणारी नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावे, हत्तींना तत्काळ पकडण्यात यावे, हत्तींचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले फटाके व इतर साहित्य पुरविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीसाठी वनविभागाकडून मनुष्यबळ पुरविण्यात यावे, शंभर टक्के अनुदानावर सौरकुंपण उभारण्यास परवानगी देण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर तेली यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रधान सचिव खरगे उपस्थित होते. या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. नुकसान भरपाई वाढवून देण्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव कोल्हापूरचे मुख्य संरक्षक पाटील यांना तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

Web Title: Sindhudurg: Will be implementing elephants to campaign in Dodamarg taluka: Vikas Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.