सिंधुदुर्ग : महिलांनी काथ्या युनिटातून आर्थिक स्तर उंचवावा : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:29 PM2018-11-03T17:29:57+5:302018-11-03T17:31:00+5:30

काथ्यापासून उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत मागणी असल्याने काथ्या उद्योग महिलांना रोजगार देणारा व्यवसाय आहे. वेंगुर्लेतील महिला काथ्या उद्योगाचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील महिलांनी काथ्या युनिट तयार करून आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे केले.

Sindhudurg: Women should raise financial level from Kathya Yunita: Chitra Wagh | सिंधुदुर्ग : महिलांनी काथ्या युनिटातून आर्थिक स्तर उंचवावा : चित्रा वाघ

चित्रा वाघ यांना एम. के. गावडे यांनी काथ्याविषयी माहिती दिली. (सावळाराम भराडकर)

Next
ठळक मुद्देमहिलांनी काथ्या युनिटातून आर्थिक स्तर उंचवावा : चित्रा वाघ वेंगुर्लेतील महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्थेला भेट

सिंधुदुर्ग : काथ्यापासून उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत मागणी असल्याने काथ्या उद्योग महिलांना रोजगार देणारा व्यवसाय आहे. वेंगुर्लेतील महिला काथ्या उद्योगाचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील महिलांनी काथ्या युनिट तयार करून आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वेंगुर्लेतील महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्थेला भेट देत काथ्यापासून बनविलेल्या विविध वस्तूंची माहिती घेतली. यावेळी संस्था संचालिका प्रज्ञा परब यांनी काथ्या प्रक्रियेची महिती दिली. तर संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी नारळाच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे तसेच या उत्पादित वस्तूंपासून शासनाकडून मिळणारे उत्पन्न व महिला वर्गाला उपलब्ध होणारा रोजगार याविषयी माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, मालवण क्वायर क्लस्टरच्या अध्यक्षा अरुणा सावंत, सावंतवाडी क्वायर क्लस्टरच्या गीता परब, श्रुती रेडकर, वर्षा मडगावकर, दीपिका राणे, सुरंगी महिला संस्थेच्या सुजाता देसाई, सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या प्रविणा खानोलकर, पंचायत समिती सदस्या साक्षी कुबल, नितीन कुबल, योगेश कुबल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, वनिता मांजरेकर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Sindhudurg: Women should raise financial level from Kathya Yunita: Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.