सिंधुदुर्गला पुन्हा झोडपले

By admin | Published: October 4, 2015 10:18 PM2015-10-04T22:18:06+5:302015-10-04T23:40:55+5:30

दुपारनंतर जोरदार पाऊस : वातावरणात गारवा

Sindhudurga shrank again | सिंधुदुर्गला पुन्हा झोडपले

सिंधुदुर्गला पुन्हा झोडपले

Next

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्गात अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते.
तसेच सायंकाळी चार वाजल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, सायंकाळपासून जिल्ह्यात मोठ्या नुकसानीची नोंद नव्हती.आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतरही जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते.रविवारी सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. कडक ऊन तसेच मधूनच कोसळणारा पाऊस यामुळे तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
करुळ, भुईबावडा घाटांतील वाहतूक सुरळीत
वैभववाडी तालुक्यात दुपारपासून दमदार पाऊस सुरू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, या पावसाचा वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे करूळ व भुईबावडा घाटांसह तालुक्यातील वाहतूक सुरळीत होती.

Web Title: Sindhudurga shrank again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.