सिंधुदुर्गवासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:19 PM2020-03-14T13:19:24+5:302020-03-14T13:21:21+5:30

या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़.

Sindhudurgis must receive toll waiver! | सिंधुदुर्गवासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे !

कणकवली शासकीय विश्रामगृह येथे टोल माफीचा निर्धार करताना कृती समितीचे कार्यकर्ते

Next
ठळक मुद्देनागरिकांची मागणी ; प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवलीत टोल माफी कृती समितीची स्थापना; सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण होताना ओसरगाव येथे टोल नाका उभारणी करण्यात आली आहे.  या टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व वाहनांना टोल माफी मिळावी़ .त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये टोल मुक्तीचे ठराव घेण्यात यावेत. असे ठरविण्यात आले. तर सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे टोलमाफी मिळण्यासंदर्भात टोलमुक्ती कृती समितीच्यावतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टोलमुक्ती कृती समितीही या बैठकीत स्थापन करण्यात आली . या समितीच्या निमंत्रकपदी अशोक करंबळेकर, बाळू मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

      कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे टोल माफी संदर्भात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अशोक करंबळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, डॉ. विद्याधर तायशेटे, बाळू मेस्त्री, संजय मालंडकर, राजस रेगे, मनोहर पालयेकर, राजेश सावंत, हनिफ पिरखान, भाई जेठे, बाळकृष्ण बावकर, सचिन सादये, महानंद चव्हाण, श्रीकांत तेली, दयानंद उबाळे, नितीनकुमार पटेल, संजय राणे, गणेश राणे, परेश परुळेकर, अमित आवटे, हरिष गणपत्ये, विजय मसुरकर, विशाल हर्णे, मारूती वरवडेकर, हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, सुशांत दळवी, ज्ञानेश पाताडे, गौरव हर्णे आदींसह नागरीक, वाहनधारक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

        या बैठकीत अशोक करंबळेकर यांनी रस्ते विकास करताना तो शासनाने खाजगी विकासकामार्फत भागीदारीत केलेला आहे़ त्यामुळे टोल कर स्वरूपात गोळा केला जाणार आहे. मात्र , त्या टोलच्या पाच किलोमिटरच्या अंतरातील नागरीकांच्या वाहनांना टोलमाफी मिळेल़. लवकरच टोल सुरू होणार आहे़ . त्यामुळे आपल्याला वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल़ . तसेच बाळू मेस्त्री यांनी ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत या ठिकाणी टोलमाफी मिळावी.  या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़.

टोल माफी कृती समिती गठीत!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन धारकांना टोल माफीतून दिलासा देण्याच्या दृष्टीने कणकवली येथे टोल माफी कृती समिती गठीत करण्यात आली़  आहे. त्यामध्ये  निमंत्रक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबळेकर, बाळू मेस्त्री, विशाल कामत, संजय राणे, अ‍ॅड़ मनोज रावराणे, सुशांत दळवी आदींचा समावेश आहे.

 

 

Web Title: Sindhudurgis must receive toll waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.