कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्गचा सर्वांगिण विकास -  केसरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 08:15 PM2017-08-15T20:15:21+5:302017-08-15T20:15:26+5:30

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला. 

Sindhudurg's all-round development on agriculture mechanization, horticulture and tourism - Kesarkar | कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्गचा सर्वांगिण विकास -  केसरकर 

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्गचा सर्वांगिण विकास -  केसरकर 

Next

सिंधुदुर्गनगरी दि. 15 - कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला. 
 भारतीय स्वातंत्रयदिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्यजारोहण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.
कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरण व्हावे, पर्यटन विकासाला चालना मिळावी, पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास व्हावा, श्री भात पध्दतीचा विस्तार होऊन भात शेती किफायतशीर व्हावी या अनुषंगाने चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना सिंधुदुर्गात राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन केसरकर  म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करुन आर्थिक जीवनमान उंचावल्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटन व सिंधुदुर्ग यांच नांत अधिक दृढ आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात प्रगतीचा चढता आलेख ठेवला आहे. 
 सिंधुदुर्गातील शेतकरी पारंपरिक भात शेतीला फाटा देऊन आता श्री पध्दतीने भात लागवड करण्याकडे मोठ्‌या प्रमाणात आकर्षित झाला आहे. गतवर्षी श्री पध्दतीने भात लागवडीचे एक हजार हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात होते. यंदाच्या वर्षी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड झाली असल्याचे सांगून केसरकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात फळझाड लागवडीचं प्रमाण अत्यल्प होत. तथापि जिल्हा प्रशासन, कृषी व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाव्दारे यंदाच्या वर्षी आठ हजार 500 हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवड होत आहे.  
 कृषी सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षात सिंधुदर्गात 16 हजार 375 वनराई / कच्चे बंधारे धडक कार्यक्रमाव्दारे बांधण्यात आल्याचे सांगुन पालकमंत्री म्हणाले की, कोल्हापूर पध्दतीच्या 29 बंधा-याची कामे पुर्ण करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील 308 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली. स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा तसेच या महिन्यात येणा-या गणशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.   मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास आमदार वैभव नाईक, प्रभाकर सावंत जिल्हास्तरीय अधिकारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होती. ल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते सकाळी ठीक 08.30 वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते. 
 

Web Title: Sindhudurg's all-round development on agriculture mechanization, horticulture and tourism - Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.