धक्कादायक ! चक्क सख्ख्या भावानेच केले बहिणीवर अत्याचार, तक्रारदार युवती गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:32 PM2018-07-25T17:32:58+5:302018-07-25T17:36:05+5:30
सावंतवाडी तालुक्यातील एका गावात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केले असून, बहीण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील एका गावात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केले असून, बहीण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. याबाबत बहिणीने नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात भावाविरोधात तक्रार दिली असून, ती शून्य नंबरने सावंतवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील कुटुंबात आई, भाऊ व बहीण असा परिवार राहतो. बहिणीचे शिक्षण येथील एका महाविद्यालयात झाले असून, ती शिक्षणाच्या काळात सावंतवाडी येथेच राहत होती. फक्त शनिवार-रविवारीच आपल्या घरी जात होती. याच दरम्यान भावाने आई घरात नसल्याचा फायदा उठवित बहिणीवर अत्याचार केले. तसेच याची माहिती जर बाहेर कुठे दिली तर ठार मारण्याची धमकीही दिली.
ही मुलगी अलीकडेच नवी मुंबई-वाशी येथे आपल्या बहिणीकडे राहण्यास गेली. यावेळी तिला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात तपासणीसाठी गेली असता तेथे तिच्या वेगवेगळ््या चाचण्या करण्यात आल्या. यात ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले. त्यानंतर याबाबत वाशी पोलिसांना माहिती देण्यात आली. वाशी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अत्याचारग्रस्त मुलीची तक्रार नोंदवून घेतली आहे.
बलात्काराचा गुन्हा
सावंतवाडी पोलिसांनी वाशी पोलिसांकडून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे करीत आहेत.