सावंतवाडीत शिवप्रेमींचा उत्साह
By admin | Published: February 19, 2015 10:35 PM2015-02-19T22:35:00+5:302015-02-19T23:49:07+5:30
शिवजयंती साजरी : घोड्यांसह ढोलताशांच्या गजरात शहरातून रॅली
सावंतवाडी : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ च्या घोषात शिवजयंतीनिमित्त सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन गुरूवारी भव्य शिवरॅली शहरातून काढली. या रॅलीचे उद्घाटन राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य शिवरॅलीमध्ये सावंतवाडी शहरातील सर्व रिक्षा चालकांनीही सहभाग घेतल्याने अवघ्या दीड किलोमीटर अंतराची ही रॅली सावंतवाडी शहरातून काढण्यात आली. संस्थानकालीन राजवाडा येथे सावंतवाडी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी गुरूवारी सकाळी १० वाजता एकत्र जमले. सोबतच घोडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत कलाकार, सर्व शिवप्रेमींच्या डोक्यावर भगवे फेटे, ढोल ताशांच्या गजरात सावंतवाडी राजवाडा येथून भव्य अशी शिवरॅली काढण्यात आली. खासकीलवाडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राजेसाहेब खेमसावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. खासकीलवाडा, मोती तलाव तीन मुशी येथून सावंतवाडी बाजारपेठ शिवाजी चौक येथून उभाबाजार मार्गे चितारआळी, एसटी बसस्थानक मार्गे गवळीतिठा येथे या रॅलीची सांगता झाली. प्रत्येक चौकामध्ये लावण्यात आलेले जुने भगवे काढून नवीन भगवे लावण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव आदी घोषणांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात काढलेल्या या रॅलीत युवकांसह तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शिवाजीच्या वेशातील मंगेश गावडे व छोट्या मावळ्याच्या वेशातील फ्रे ड डिसिल्वा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, वसंत केसरकर, मंगेश तळवणेकर, सुरेश भोगटे, राजू पनवेलकर, अमेय तेंडोलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू नाईक, नगरसेवक देवेंद्र टेमकर, दिलीप भालेकर, रवींद्र म्हापसेकर, गुरू मठकर, एकनाथ नारोजी, शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार, महेश पांचाळ, संतोष गोवेकर, साईनाथ गोवेकर, शैलेश तावडे, विलास सावंत, नाना भराडी, मनसे शहराध्यक्ष सागर कांदळगावकर, प्रशांत मोरजकर, भाजप शहराध्यक्ष सिध्दार्थ भांबुरे, आनंद नेवगी, विराग मडकईकर, मंदार पिळणकर, राष्ट्रवादीचे विजय कदम, अशोक पवार, राजू पनवेलकर, सचिन घाडी, अरुण घाडी, संजू शिरोडकर व शहरातील सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शिवरॅलीची सांगता वंदे मातरमने झाली. (वार्ताहर)
सर्वपक्षीय एकत्र
या रॅलीमध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्व पक्षातील नेते व पदाधिकारी, शहरातील सुमारे शंभर रिक्षा यांच्यासह सुमारे १००० शिवप्रेमींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.