कौशल्य विकास मार्गदर्शन उपयुक्त : आर. एन. वाकुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 06:57 PM2017-09-04T18:57:34+5:302017-09-04T18:57:39+5:30

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रामार्फत मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी आर. एन. वाकुडे यांनी कुडाळ येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात केले.

Skill Development Guidance Appropriate: R. N. Wake up | कौशल्य विकास मार्गदर्शन उपयुक्त : आर. एन. वाकुडे

कौशल्य विकास मार्गदर्शन उपयुक्त : आर. एन. वाकुडे

Next


सिंधुदुर्गनगरी दि. 0४ : उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाºया युवक -युवतींसाठी जीवनाची वाटचाल यशस्वी व्हावी तसेच स्वत:चा रोजगार सुरु करण्याच स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रामार्फत मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी आर. एन. वाकुडे यांनी कुडाळ येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कुडाळ येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रात (आरसेटी) आयोजित संवादपर्व या कार्यक्रमात वाकुडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, आरसेटी केंद्राचे संचालक प्रल्हाद नाईक उपस्थित होते.

स्किल डेव्हलपमेंट अर्थातच कौशल्य विकासाला आज अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे. कौशल्य विकासातूनच रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, असे सांगून वाकुडे म्हणाले की, या अनुषंगाने शासनामार्फत विविध व्यवसायाच्या मिळणा-या मोफत प्रशिक्षणाचा लाभ तरुणांनी मोठ्या प्रमाणावर घ्यायला हवा. संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून इच्छुक प्रशिक्षणार्थींना कर्ज उपलब्धतेबाबत माहिती मिळाली आहे. या आधारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या उद्योग व्यवसाय उभा करण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी संवादपर्व कार्यक्रमाचा हेतू सांगून स्पर्धा परीक्षा तसेच शासनाच्या विकास योजनांची सर्वकष माहिती मिळण्यासाठी उपयुक्त असलेल्या मासिक लोकराज्यचे वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी केले. केंद्राचे संचालक प्रल्हाद नाईक यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी व आत्मविश्वास वृध्दीसाठी प्रशिक्षणार्थींना यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशिक्षक अमजद मुल्ला, शिवनंद परशुराम प्रभू, ओमकार कुबल, हेमंद धमार्जी तांबे, नितिन कांबळे, प्रशांत पाताडे, विनायक प्रभू यांनी संस्थेकडून मिळणाºया प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले.

Web Title: Skill Development Guidance Appropriate: R. N. Wake up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.