सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयामघील सोनोग्राफी मशीन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:24 AM2019-02-28T11:24:49+5:302019-02-28T11:27:11+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद असलेले सोनोग्राफी मशीन आता सुरू करणयात आले आहे. या साठी तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी गर्भघारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्या अंतर्गत जिल्हा स्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.
सिंधुदुर्ग : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद असलेले सोनोग्राफी मशीन आता सुरू करणयात आले आहे. या साठी तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी गर्भघारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्या अंतर्गत जिल्हा स्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.
या बैठकीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी नेमण्यात आलेल्या तंत्रज्ञांच्या नेमणुकीला जिल्हा सल्लागार समितीची मंजूरी घेण्यात आली. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही सोनोग्राफिची सोय करण्यात आल्याचे या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी गंर्भलिंग निदान चाचणी होत असल्यास नागरिकांनी 1800-233-4475 या टोल फ्री क्रमंकावर महिती कळवावी किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर माहिती कळवावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तसेच संबंधित सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाले नंतर एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील अशी माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली.
बैठकीस जिल्हा सल्लागार समितीच्या अध्यक्षा तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील, डॉ. सुमन नाईक, ॲड. अमोल सामंत, सुष्मा कुलकर्णी, प्रसाद परब, हेमंत धुरी, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.