दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली माउली देवीचा आज जत्रोत्सव, प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:45 PM2021-11-20T13:45:08+5:302021-11-20T13:45:42+5:30
तळवडे : दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोसव म्हटले की ...
तळवडे : दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोसव म्हटले की सिंधुदुर्ग जिल्हा भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दर्शनासाठी येतात. सोनुर्ली माउली देवीचा जत्रोत्सव आज २० नोंव्हेबर रोजी संपन्न होत आहे.
यावर्षी तर पूर्ण मंदिर परिसर पण वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भक्तगणांना माउली देवीचे सुलभ दर्शन घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी न झाल्याने यावर्षी कोरोना संबधीचे सर्व नियम पाळून हा जत्रोस्तव साजरा केला जाणार आहे.
नियमाचे पालन करुन भक्तगणांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे. जत्रोत्सवात मास्क वापरणे बंधनकाराक असणार आहे. यावर्षी माउली भक्तगण याना माउली देवीचे दर्शन सुलभ रित्या घेता यावे या करता देवस्थान कमिटीने चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे.