भरधाव दुचाकीची एसटीला धडक, चालक जागीच ठार; मालवण-हडी येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 20, 2024 05:07 PM2024-06-20T17:07:56+5:302024-06-20T17:08:30+5:30

मालवण : दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शिवाजी ...

Speeding bike hits ST, driver killed on the spot; Incident at Malvan Hadi | भरधाव दुचाकीची एसटीला धडक, चालक जागीच ठार; मालवण-हडी येथील घटना

भरधाव दुचाकीची एसटीला धडक, चालक जागीच ठार; मालवण-हडी येथील घटना

मालवण : दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय २८, रा. हडी जठारवाडी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास हडी येथे घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण- तांबळडेग एसटी क्रमांक (एम एच-१४ बीटी-१७७९) ला हडी नागेश्वर मंदिर जवळच्या रस्त्यावर समोरून आलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच ०७- एम- ०९७२) ची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार शिवाजी सुर्वे याचे डोके एसटी बसच्या पुढील भागास आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती एसटीचे चालक धर्मांण्णा मौला नडगिरी यांनी पोलिस ठाण्यात फोनद्वारे कळविली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नांदोसकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर व पोलिस कॉन्स्टेबल प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला. मृत शिवाजी सुर्वे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Web Title: Speeding bike hits ST, driver killed on the spot; Incident at Malvan Hadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.