कवितेमुळे आत्मिक समाधान
By admin | Published: September 18, 2015 09:32 PM2015-09-18T21:32:20+5:302015-09-18T23:23:33+5:30
मनोहर प्रभू : मालवण येथील भंडारी हायस्कूलमध्ये कार्यक्रम
मालवण : कविता ही स्वानंद देणारी असावी. कवितेमुळे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते. काव्य हे शिकवायचे नसते, तर ते स्वत: अनुभवायचे असते. श्रावणगीते, पावसाची गाणी ही गायल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपण एका भावविश्वात न्हाऊन निघतो. भंडारी हायस्कूलने आयोजित केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक मनोहर प्रभू यांनी येथे बोलताना केले.मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मालवणचे साहित्यिक आणि भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी रवींद्र वराडकर, मुख्याध्यापिका समिता मुणगेकर, पर्यवेक्षिका गौरी शिंदे, आदी उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे सहायक शिक्षिका हेमश्री मांजरेकर यांनी स्वागत केले. यावेळी रवींद्र वराडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका समिता मुणगेकर यांनी
मराठी काव्याची महती सांगतानाच विद्यार्थ्यांनी निसर्गाकडे दुर्लक्ष करू नये, असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात प्रशालेच्या दत्ताराम सारंग, लीना धुरी, स्नेहल मोंडकर, तन्वी पराडकर, साक्षी केळुसकर, लीशा कडू, अमृता वायंगणकर, श्वेता चव्हाण, मंथन बांदेकर, तन्वी आंबेरकर, करीना खराडे, स्नेहल पाटकर, निशिता चव्हाण, अमृता माळगे, विशाखा गावकर, गौरी मेस्त्री, साक्षी राऊळ, दिव्या चव्हाण, गायत्री पडते, मृण्मयी वर्देकर, सुकन्या देऊलकर, चिन्मय गवंडे, हेमा केरकर, गायत्री कोयंडे, पायल आढाव, शामल आंबेरकर, पल्लवी कोळगे, करुणा माडये, मिताली गोवेकर, सोहम कांबळी, प्रथमेश सामंत, दिव्या मालवणकर, प्रवरा कांबळी यांनी सहभाग घेत विविध श्रावणगीते सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजा सामंत हिने केले.
निसर्गाचे मुलांशी असलेले नाते हरवतेय...यावेळी मनोहर प्रभू म्हणाले, पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये तालबद्ध कवितांचा समावेश असायचा. आज गद्यात्मक काव्य प्रकार सुरू झाला आहे. तालबद्ध काव्यामुळे मुलांना कविता समजतेच. शिवाय आत्मिक समाधानही प्राप्त होते. आजच्या काळातील गद्यात्मक कवितांमुळे हे सारे मागे पडले आह, असे असताना जुन्या नव्या पावसाळी गीतांवर आधारित प्रशालेने आयोजित केलेला हा कार्यक्रम एक स्तुत्य उपक्रम
आहे, असे सांगून निसर्गाचे मुलांशी असलेले नाते आधुनिक तंत्रज्ञानाने हरवत चालले आह,े असेही ते म्हणाले.