सिंधुदुर्गात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: May 6, 2017 04:41 PM2017-05-06T16:41:37+5:302017-05-06T16:42:09+5:30
जिल्ह्यातील आठही तालुक्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 0४ : निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गास विद्यार्र्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १ मे २0१७ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरावर असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग वर्षभर आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी या वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहेत. १ मे रोजी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार श्वेता पाटोळे, अमोल पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, लेखाधिकारी पांडुरंग थोरात, नायब तहसिलदार श्रीधर गालीपेली, सागर कुलकर्णी, सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांचा अभ्यासक्रम दजेर्दार संदर्भ साहित्य यांची सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक तालुक्यासाठी समर्थ स्पर्धा परीक्षामंच स्थापन करण्यात येवून त्यांना दर आठ दिवसानंतर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनातील उच्च पदावरील अधिकारी या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मार्गदर्शन करतील. प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक आणि मार्गदर्शकांचा पॅनल तयार करुन सातत्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. माहराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच जिल्हा स्तरावरुन भरती परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन वर्गाचा सर्व होतकरु विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले आहे.