आंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:52 PM2020-02-18T16:52:12+5:302020-02-18T16:52:51+5:30

आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विभागाने उभारलेल्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Spontaneous response to the exhibition of the Industry Department at Anganwadi | आंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

आंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देआंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसादउत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांचे अर्थसहाय्य

सिंधुदुर्गनगरी: आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विभागाने उभारलेल्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये उद्योग विभाग, एमआयडीसी, एमएसएसआयडीसी, केव्हीआयबी, एमसीईडी सह शासकीय महामंडळे, बँका, यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच उद्योग विभागाअंतर्गत स्थापित फळ प्रक्रिया उद्योग, काजू प्रक्रिया, मॉड्युलर फर्निचर, काथ्या उद्योग यामधील 7 समुह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत स्थापित 2 घटकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या प्रदर्शनावेळी बेरोजगार युवकांना ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची सुविधा उपबल्ध करुन देण्यात आली होती.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, व्यवस्थापक परशुराम गावडे, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अतुल सातपुते, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रिय व्यवस्थापक अतुल जोशी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुणकुमार झा उपस्थित होते.

उत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांचे अर्थसहाय्य

या योजनेअंतर्गत लघु उद्योग स्थापन करण्यासाठी सेवा उद्योगांसाठी 10 लाख आणि उत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येते.

Web Title: Spontaneous response to the exhibition of the Industry Department at Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.