सिंधुदुर्गात फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:00 PM2017-08-31T13:00:42+5:302017-08-31T13:05:25+5:30

 Spontaneous response to the football training camp in Sindhudurg | सिंधुदुर्गात फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गात फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देशिबिरासाठी २४३ शाळांमधील क्रीडा शिक्षकांची निवड कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यातील क्रीडा शिक्षकांशी हितगुज १७ वषार्खालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा तज्ञ मार्गदर्शक उपस्थित, क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने महाराष्ट्र मिशन १ मिलीयन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील २४३ माध्यमिक शाळा व ज्यनि. कॉलेज यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.

कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात निवड केलेल्या शाळातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

१७ वषार्खालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा प्रथमच दि. ६ ते २४ आॅक्टोबर २0१७ या दरम्यान भारतात होत असून त्यातील काही सामने या निमित्ताने राज्यातील डी. वाय. पाटील क्रीडांगणावर होणार आहेत.

फुटबॉल खेळाचा प्रचार, प्रसार व्हावा, नवीन पिढी सक्षम व्हावी. वाईट सवयी पासून ही पिढी दूर राहून क्रीडा बाबीकडै त्यांचे लक्ष वळावे या हेतूने तसेच १७ वषार्खालील भारतीय फुटबॉल संघास पाठिंबा मिळावा यासाठी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कणकवली तालुक्यासाठी अच्युत वनवे, बयाजी बुराण, वैभववाडी तालुक्यासाठी चंद्रकांत यादव, देवकर, तर देवगड तालुक्यासाठी अमोल जमदाडे, बाळासाहेब ढेरे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या क्रीडा प्रशिक्षण वर्गास जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी सदिच्छा भेट देऊन क्रीडा शिक्षकांशी हितगुज साधले.

Web Title:  Spontaneous response to the football training camp in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.