कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 31, 2014 10:24 PM2014-08-31T22:24:37+5:302014-08-31T23:30:47+5:30
तालुकास्तरीय स्पर्धा : कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजन
सावंतवाडी : येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या लहान गटात सूरज इंगळे, रोहन निर्मळ, आनंद लोकरे, सौरभ अंबाड, सचिन मगदूम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तालुका क्रीडा व्यवस्थापन समिती व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित तालुकास्तरीय शालेय गटातील कुस्ती स्पर्धा येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात मॅटवर झाल्या. स्पर्धांचे उद्घाटन मुख्याध्यापक सी. ए. काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ए. एम. बेकनाळकर, प्रदीप सावंत, पी. एन. पांगम उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे - १४ वर्षाखालील मुलगे ३२ किलो गट- सूरज इंगळे (पब्लिक स्कूल, आंबोली), ३५ किलो-आनंद लोकरे (पब्लिक स्कूल, आंबोली), ३८ किलो- रोहन निर्मळ, ४५ किलो- सौरभ अंबाड (दोन्ही कळसुलकर हायस्कूल), ४९ किलो - सचिन मगदूम (पब्लिक स्कूल).
१७ वर्षाखालील मुलगे- ४२ किलो-संकेत सावंत, सोहेल मुजावर (दोघे कळसुलकर हायस्कूल), ४६ किलो- करणसिंह भोसले (पब्लिक स्कूल), अंकित सावंत (कळसुलकर हायस्कूल), ५० किलो-अनिकेत बांदिवडेकर (कळसुलकर हायस्कूल), ५४ किलो-सतीश पाटील (पब्लिक स्कूल), ५८ किलो-जितेंद्र रायका. ६३ किलो- विष्णू बांदेकर, ६९ किलो-ललित हरमळकर (तिन्ही कळसुलकर), ८५ किलो-प्रणव यादव (पब्लिक स्कूल), १९ वर्षांखालील मुले-४६ किलो-किरण नाईक (कळसुलकर हायस्कूल), ५० किलो-निहाल होंगल, ५५ किलो-विवेक कदम (दोन्ही एसपीके), ६६ किलो-सिदेश परब (कळसुलकर ज्युनिअर कॉलेज).
यावेळी पंच म्हणून वाय. पी. नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन क्र ीडा शिक्षक यू. आर. लाड व पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री. सावंत आदींनी केले. (वार्ताहर)