एसटी कर्मचारी प्रश्न : आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:41 PM2020-12-15T18:41:09+5:302020-12-15T18:43:15+5:30
state transport,Sindhududurgnews, bjp मुंबईत सेवा देण्यासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? आता कर्मचाऱ्यांना तिकडे पाठवू नका. एकाच कर्मचाऱ्याला वेठीस का धरता ? असे प्रश्न विचारत यासह अनेक मुद्यांवर एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.
कणकवली : मुंबईत सेवा देण्यासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? आता कर्मचाऱ्यांना तिकडे पाठवू नका. एकाच कर्मचाऱ्याला वेठीस का धरता ? असे प्रश्न विचारत यासह अनेक मुद्यांवर एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.
त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त ८ दिवस ड्युटी राहील. कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातील. ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मुबंईत सेवा देण्यासाठी पाठविले जाणार नाही. ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या सुरळीत केल्या जातील, असे आश्वासन रसाळ यांनी दिले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
कणकवली बसस्थानक येथे मुंबईत जाणाऱ्या एसटी रोखल्यानंतर विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ तिथे दाखल झाले. काही शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर कणकवली आगारप्रमुख यांच्या दालनात चर्चा झाली. या चर्चेत आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मोबाईलवरून आमदार नीतेश राणे यांनी विभाग नियंत्रक रसाळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सभापती दिलीप तळेकर, उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव, संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सचिन परधिये, संदीप सावंत, विजय कदम, अनिल घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्यावी
एसटी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने मुंबईला सेवा देण्यासाठी पाठविले जाते. तिथे कोविडबाबत कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविली जात नाही. एकाच कर्मचाऱ्याला दोन ते तीन वेळा पाठविले जा. तर काहींना एकदाही मुंबईला पाठविले गेले नाही. त्यामुळे सर्वांनाच समान वागणूक द्यावी, अशा विविध मागण्या मांडून भाजप पदाधिकाऱ्यांनी रसाळ यांना घेराव घातला.