एसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:12 PM2020-12-24T20:12:31+5:302020-12-24T20:14:17+5:30

Coronavirus Unlock State Transport- मुंबईहून आलेल्या कुडाळ आगारातील वाहक आणि चालक यांना लोकवस्तीच्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन न करता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये ठेवावे, याकरिता कुडाळ भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक राकेश कांदे यांनी एसटीचे वाहतूक नियंत्रक यांचे लक्ष वेधले आहे. संबंधित गोष्टीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.

ST staff should be removed from the population: Rakesh Kande | एसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे

एसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे

googlenewsNext
ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार

कुडाळ : मुंबईहून आलेल्या कुडाळ आगारातील वाहक आणि चालक यांना लोकवस्तीच्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन न करता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये ठेवावे, याकरिता कुडाळ भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक राकेश कांदे यांनी एसटीचे वाहतूक नियंत्रक यांचे लक्ष वेधले आहे. संबंधित गोष्टीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईत बेस्टमध्ये सेवा बजावून आलेले वाहक आणि चालक यांना कुडाळ एसटी प्रशासनाने नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन केले होते. लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकामध्ये अपुरी सोय असताना क्वारंटाईन करणे हे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. त्या कर्मचाऱ्यांना बसस्थानकाच्या वरच्या मजल्यावर बघताच कुडाळ शहरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.

नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे आणि वाहतूक नियंत्रक रसाळ यांच्याशी यासंबंधी चर्चा केली. या कर्मचाऱ्यांना लोकवस्तीत न ठेवता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था करावी अशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

मुख्याधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नाही

कुडाळच्या नूतन बसस्थानक इमारतीमध्ये क्वारंटाईन केले असले तरीही जेवणासाठी चालक-वाहकांना एसटीमधून नवीन कुडाळ आगात यावे लागते. नवीन इमारतीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये क्वारंटाईन ठेवण्याआधी बसस्थानकाच्या यंत्रणेने कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. याबाबत नगरसेवक राकेश कांदे यांनी मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Web Title: ST staff should be removed from the population: Rakesh Kande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.