सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:39 PM2020-01-13T12:39:18+5:302020-01-13T12:48:23+5:30

खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

ST will survive if everyone plays efficiently: Dilip Shatrapatte's view | सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

कणकवली येथे एसटीच्या सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते . या मोहिमेच्या शुभारंभ शनिवारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नितीन कटेकर, प्रसाद दळवी, प्रकाश रसाळ आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे यांचे मत कणकवली येथे एसटीच्या सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन

कणकवली : खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी २०२० या कालावधीत सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन केले आहे . या मोहिमेच्या शुभारंभ शनिवारी कणकवली येथे झाला . यावेळी डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते .

यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ . नितीन कटेकर , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी , तहसिलदार आर. जे. पवार, एसटीचे विभागिय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, इंटकचे विभागिय अध्यक्ष अशोक राणे, कामगार संघटनेचे विभागिय सचिव विनय राणे, श्रीमती कुबडे, निलेश लाड, वाहन निरीक्षक जावेद शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, गोसावी, सरनोबत व इतर अधिकारी उपस्थित होते .

डॉ. पांढरपट्टे म्हणाले, एसटीला लोकवाहिनी म्हटले जाते. एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास ही बाब ग्रामिण भागातील प्रत्येकाच्या मनावर बिंबलेली आहे. एखाद्या किरकोळ चुकीमुळेही गंभीर अपघात होऊ शकतो, यासाठी सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची आहे. मार्गावर असणाऱ्या होडींग, बॅनर यांच्यावरही नियंत्रण असायला हवे , कारण त्यापासूनही अपघात होऊ शकतात. तसेच चालकांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे.

त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे . जागरूकता कायम ठेवली तर अपघाताचे प्रमाण आणखीन कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असेही पांढरपट्टे म्हणाले. यावेळी नितीन कटेकर यांनी सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे, ही बाब निश्चितच चांगली असल्याचे स्पष्ट करताना जगभरातील एकून वाहन संख्येच्या १ टक्के वाहने भारतात आहेत .

मात्र जगभरात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या ६ टक्के अपघात भारतात होतात व एकूण मृत्यूच्या १० टक्के लोक भारतातील मरतात , असे स्पष्ट केले . अनेकदा अपघात वाहनांचा जास्त वेग , दारू पिऊन वाहन चालविणे , वाहन चालविताना बोलणे किंवा चालकाला पुरेशी विश्रांती नसणे यामुळे होत असतात.


प्रसाद दळवी म्हणाले, अपघात सांगून येत नसतात . पण आवश्यक काळजी , सुरक्षितता घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात . यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना . कायदे करण्यात येत आहेत . मात्र ,केवळ कायदे करून दंड वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. तर मानसिकतेत बदल व्हायला हवा , असे सांगितले .तर अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक करताना प्रकाश रसाळ म्हणाले, गत वर्षभरात सिंधुदुर्ग विभागात ५३ अपघात झाले . यात ६ प्राणांतीक , ३४ गंभीर व १३ किरकोळ होते . यापोटी ८६ लाखांची भरपाई एसटीकडून देण्यात आले आहेत. एसटीकडून सुरक्षिततेबाबतच्या सूचना देण्यात येत असतात. हा पंधरवडा सुरक्षितता मोहिम म्हणून राबविण्यात येत असला तरीही आपण कायम सुरक्षिततेला प्राधान्य देत काम केले पाहिजे , असे संगितले . यावेळी आर . एल . कांबळे , अशोक राणे . विनय राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले तर आभार रविंद्र भिसे यांनी मानले .
 

Web Title: ST will survive if everyone plays efficiently: Dilip Shatrapatte's view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.