सर्वंकष माहितीकोष २0१७ च्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 05:34 PM2017-09-05T17:34:30+5:302017-09-05T17:37:15+5:30

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाºयांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

Start of the comprehensive database of 2017 | सर्वंकष माहितीकोष २0१७ च्या कामास प्रारंभ

सर्वंकष माहितीकोष २0१७ च्या कामास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून कार्यवाही शासनसेवेतील सर्व कर्मचाºयांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत होणार कर्मचाºयांची माहिती संगणक आज्ञावलीमध्ये नोंदवण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : नियोजन विभागाच्या दि. २0 जुलै २0१७ च्या शासन परिपत्रान्वये महाराष्ट्र शासनाच्या अर्थ वा सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाºयांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

या कर्मचा-यांचा सर्वकष माहितीकोष (ऐस्र’ङ्म८ीी२ टं२३ी१ ऊं१ंं२ी- एटऊु) अद्ययावत करण्याकरिता संगणकीय आॅनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांना छङ्मॅ्रल्ल कऊ व ढं२२६ङ्म१ ि देण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु झालेली आहे. त्या अनुषंगाने शासन परिपत्रकातील नमुद वेळापत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून या कामास सुरुवात झाली आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकाºयांनी १ जुलै २0१७ या संदर्भ दिनांकास त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाºयांची माहिती संगणक आज्ञावलीमध्ये नोंदवावयाची अथवा अद्ययावत करावयाची आहे.

माहिती सादर केल्याचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. सदर प्रमाणपत्र नोव्हेंबर २0१७ च्या वेतन देयकासोबत कोषागारास सादर करावयाचे आहे व माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन फेब्रुवारी २0१८ च्या वेतन देयकासोबत कोषागारास सादर करावायाचे आहे.

शासकीय कर्मचाºयांचा सर्वकष माहितीकोष माहिती सादर केल्याबाबतचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी दिलेले पहिले प्रमाणपत्र नोव्हेंबर २0१७ च्या वेतन देयकासोबत व त्यातील माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र फेब्रुवारी २0१८ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची देयके अधिदान व लेखा कार्यालयाने अथवा कोषागाराने स्विकारु नयेत अशा सूचना शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या आहेत.

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व कर्मचाºयांची माहिती संगणक आज्ञावलीमध्ये नोंदवावयाची कार्यवाही शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार करावी.
य. मो. बुधावले,
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सिंधुदुर्ग

Web Title: Start of the comprehensive database of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.