पेयजल पुरवठा यंत्रणेचा प्रारंभ

By admin | Published: March 25, 2016 11:20 PM2016-03-25T23:20:01+5:302016-03-25T23:38:42+5:30

सुरेश प्रभू यांची उपस्थिती : कणकवली रेल्वेस्थानकात सुविधा

Start of drinking water supply system | पेयजल पुरवठा यंत्रणेचा प्रारंभ

पेयजल पुरवठा यंत्रणेचा प्रारंभ

Next

कणकवली : कोकण रेल्वेच्या प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कणकवली रेल्वे स्थानकातही प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शुद्ध पेयजल पुरवठा यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन शुक्रवारी केंद्र्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेविका राजश्री धुमाळे, नंदिनी धुमाळे, प्रज्ञा ढवण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुका प्रमुख सचिन सावंत, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या पत्नी उमा प्रभू, नागेश मोरये, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, सिद्धेश्वर तेलगु, बाळासाहेब निकम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक सुनील मोरे, सहायक पोलिस निरीक्षक गिताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)

विविध सुविधा : रेल्वे मार्गावर बसणार ६६ वॉटर फिल्टर
कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचाही तितकाच विचार करीत आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘यस’ बँके च्या सौजन्याने रेल्वेने संपूर्ण भारतात १000 रेल्वे स्थानकांवर शुद्ध पेय जल पुरवठा यंत्रणा उभारण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर ६६ वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. शुक्रवारी कणकवली रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या शुध्द पेय जल पुरवठा यंत्रणेचा प्रारंभ सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तसेच भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Start of drinking water supply system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.