सिंधुदुर्गात रोजगारान्मुख अभ्यासक्रम सुरू करा
By admin | Published: June 10, 2015 10:54 PM2015-06-10T22:54:29+5:302015-06-11T00:43:22+5:30
ई. रविंद्रन : कुडाळात स्टार स्वयंरोजगारच्या कोनशिलेचा अनावरण समारंभ
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार धर्तीवर अभ्यासक्रम सुरू करा, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी स्टार स्वयंरोजगारच्या ईमारत कोनशिलेचा अनावरण समारंभप्रसंगी केले. या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ जिल्हाधिकारी रविंद्रन यांच्या हस्ते झाला. बँक आॅफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान उपकेंद्र, कुडाळच्या इमारतीचा कोनशिला समारंभ कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. व्ही. बुचे, स्टार स्वयंरोजगारचे संचालक सुभाष नारायणकर, बँक आॅफ इंडियाचे के. बी. जाधव, ज्योती पडते, श्रीमूर्ती मानकामे, नायब तहसीलदार प्रवीण लोकरे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रविंद्रन म्हणाले, कुडाळमध्ये स्वयंरोजगारची उभी राहणारी ही इमारत या जिल्ह्यात भविष्यात नवीन तंत्रज्ञान आणेल. या ठिकाणाहून रोजगार निर्मितीचे अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. व्ही. व्ही. बुचे म्हणाले, स्टार स्वयंरोजगारच्या माध्यमातून गरजूंना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी विविध सोयी उपलब्ध करून हा प्रकल्प दीड कोेटीचा असून शासनाकडून एक कोटी मंजूरही झाले आहे व उर्वरित खर्च बँक आॅफ इंडिया करणार असून, येत्या सव्वा वर्षात हा प्रकल्प साकारणार असल्याचे ते म्हणाले. नारायणकर यांनी या संस्थेचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही वर्षात ८७ विविध कार्यक्रम व उपक्रम असून भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेच अभ्यासक्रम येथे घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)