सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:41 AM2018-12-28T10:41:39+5:302018-12-28T10:43:30+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २१ व्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला सुरुवात झाली. प्रथमच शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड दिल्याने आठ तालुक्याचे आठ रंगाच्या स्पोर्ट गणवेशात विद्यार्थी तर शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात उतरले आहेत.

Start of Sindhudurg District Level Sports Festival | सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पधेर्चे उदघाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ आंबोकर, सतीश सावंत, पल्लवी राऊळ, अंकुश जाधव, जेरॉन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभप्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड : शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या २१ व्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला सुरुवात झाली. प्रथमच शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड दिल्याने आठ तालुक्याचे आठ रंगाच्या स्पोर्ट गणवेशात विद्यार्थी तर शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात उतरले आहेत.

यावेळी गटनेते सतीश सावंत, महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ अनिशा दळवी, फादर क्लाईव्ह टेलिस, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी भारती संसारे, रामचंद्र आंगणे, शिक्षक संघटना पदाधिकारी नंदकुमार राणे, चंद्रसेन पाताडे, संतोष पाताडे, अरुण पवार, के टी चव्हाण, कणकवली सभापती सुजाता हळदीवे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते.

सुरुवातीला वेताळ बांबार्डे शाळेच्या मुलांनी ह्यबेटी बचाव, बेटी बढाव, या विषयावर गितनृत्य सादर करीत लक्ष वेधले. या महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या माउली ट्रस्ट मालवणचे पदाधिकारी, फादर क्लाईव्ह यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कसाल केंद्रातील पडवे शाळेतील मुलांनी लक्षवेधी संचालन केले.

३६६ मुलांचा होणार सन्मान

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले की, जिल्हा परिषदेने कला, क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव सुरु करून २१ वर्षे झाली. या २१ वर्षात प्रथम विजेत्या मुलांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ३६६ मुलांचा असा सन्मान होणार आहे. या स्पर्धेत छोट्या गटासाठी ११ तर मोठ्या गटासाठी १२ स्पर्धा होणार आहेत.

१५०४ मुलांना त्या-त्या तालुक्याप्रमाणे विविध रंगाचे मोफत गणवेश वाटप करण्यात आले आहेत. १७४ मुलांना सुवर्ण तर १७४ मुलांना रजत आणि १८ कांस्य पदक देण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच लंगडी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मुली व मुलगे यांच्यासाठी स्वतंत्र स्पर्धा होणार आहेत. समूहगीत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक मुलांना रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर समूहगीत गाण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

शिक्षण विभागाचे उपक्रम कौतुकास्पद

सतीश सावंत यांनी, यासाठी जिल्हा परिषद निधीची तरतूद करते. मात्र, सर्वात जास्त समाधान शिक्षण विभागाला केलेल्या तरतुदीमुळे अधिक समाधान मिळाले. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची मानसिकता सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. रणजित देसाई यांनी, जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे येथे खेळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेले उपक्रम राज्यात राबविले जातात. मुलांनी हि स्पर्धा खिलाडू वृत्तीने घ्यावे. हार स्वीकारा आणि विजय संयमाने घ्या, असे आवाहन केले.
 

Web Title: Start of Sindhudurg District Level Sports Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.