सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण
By admin | Published: May 17, 2017 02:05 PM2017-05-17T14:05:25+5:302017-05-17T14:05:25+5:30
निवड श्रेणी प्रशिक्षण विभागीय मंडळामार्फत
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणा-या शिक्षक प्रशिक्षणासाठी ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा १२ वर्षे पूर्ण आणि २४ वर्षे पूर्ण झालेली आहे तसेच जे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणास पात्र आहेत, अशा सर्व अर्हता प्राप्त शिक्षकांसाठी दिनांक १ जून ते १0 जून २0१७ या कालावधीत वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण तर दिनांक १ जून ते ६ जून २0१७ या कालावधीत निवड श्रेणी प्रशिक्षण विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेले होते.
या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्या-या तज्ञांचे विभागास्तराचे प्रशिक्षण दिनांक २८ ते ३0 मे या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. तर विभागस्तराच्या तज्ञांना मार्गदर्शन करणा-या प्रमुख मार्गदर्शक तज्ञांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण राज्य मंडळामार्फत दिनांक १९ ते २१ मे या कालावधीत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, कुसगांव बुद्रुक, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे येथे आयोजित केलेले आहे.
माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणात प्रशासकीय कारणास्तव प्रशिक्षणाचे आयोजन काही तांत्रिक बदल होत असल्यामुळे उपरोक्त कालावधीत आयोजित केलेली राज्यस्तरीय, विभागीयस्तरीय तसेच प्रत्यक्ष जिल्हा-तालुकास्तरावरील प्रशिक्षणे या काळात होणार नाहीत. माध्यमिक वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचा सुधारित नियोजनाचा कार्यक्रम यथासमय जाहीर करण्यात येईल. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणे ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत होतील.