राज्यराणी होणार ‘तुतारी एक्स्प्रेस’
By Admin | Published: May 19, 2017 11:51 PM2017-05-19T23:51:45+5:302017-05-19T23:51:45+5:30
राज्यराणी होणार ‘तुतारी एक्स्प्रेस’
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मराठीतील आद्यकवी केशवसुत यांना आदरांजली म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दादर - सावंतवाडी - दादर गाडीचे ‘राज्यराणी एक्स्प्रेस’ हे नाव बदलून ते ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कवी केशवसुत हे मराठी कवितेचे जनक मानले जातात. केशवसुत हे रत्नागिरीतील मालगुंड गावचे सुपुत्र आहेत. या आद्यकवीला श्रद्धांजली म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘तुतारी’ या कवितेचे नाव रेल्वेला देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार रेल्वे नं. ११००३/११००४ दादर - सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्स्प्रेसचे नाव बदलून आता ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात येणार आहे.
हा नामकरण समारंभ कोहिनूर सभागृह, दादर (पूर्व) येथे दि. २२ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते होणार आहे.
या समारंभाआधी दुपारी ३.३० ते सायंकाळी ४ यावेळेत सभागृहात मराठीतील नामवंत कवी केशवसुत यांच्या काही निवडक कवितांचे वाचन होणार आहे.