सेनेच्या उमेदवारीवर प्रस्थापितांचे राज्य
By Admin | Published: January 28, 2017 10:46 PM2017-01-28T22:46:48+5:302017-01-28T22:46:48+5:30
पंचायत समिती निवडणूक : उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दोन तालुक्यांबाबत मौन
रत्नागिरी : नऊपैकी सात पंचायत समिती गणांचे उमेदवार शिवसेनेने शनिवारी जाहीर केले. अनेक ठिकाणी प्रस्थापित वा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी बहाल केल्याचे दिसून आले तर मंडणगड व दापोली तालुक्यासह अनेकजण इच्छुक असलेल्या गणांची उमेदवारी अद्यापही शिवसेनेने जाहीर केलेली नाही.
पंचायत समिती : संगमेश्वर तालुका - कडवई - प्रेरणा प्रदीप कानाल, धामणी - दिलीप श्रीराम सावंत, आरवली - सोनाली रामचंद्र निकम, धामापूर - सुभाष बाबाराम नलावडे, कसबा - राखीव, फुणगूस - परशुराम गोपाळ वेल्ये, नावडी - वेदांती अतिश पाटणे, मुचरी - राखीव, कोसुंब - सारिका किरण जाधव, निवे बुद्रुक - आरती सत्यवान शिंदे, दाभोळे - संजय बाजीराव कांबळे, कोंडगाव - जयसिंग लक्ष्मण माने, ओझरे खुर्द व मोर्डे - येथील उमेदवार जाहीर झालेला नाही.
रत्नागिरी तालुका - वाटद - राखीव, वरवडे - मेघना महादेव पाष्टे, देऊड - राखीव, करबुडे - संगमेश्वर रामा सोनवडकर, मालगुंड - राखीव, कोतवडे - गजानन कमलाकर पाटील, कासारवेली - रहेना इरफान साखरकर, शिरगाव - जितेंद्र जनार्दन नेरकर, मिरजोळे - विभांजली विठोबा पाटील, फणसवळे - आकांक्षा अनंत दळवी, हातखंबा - साक्षी संतोष रावणंग, पाली - उत्तम लक्ष्मण सावंत, कुवारबाव - राखीव, नाचणे - ऋषिकेश भालचंद्र भोंगले, कर्ला - राखीव, हरचेरी - विधी विलास भातडे, फणसोप, गोळप, पावस, गावखडी - राखीव.
खेड तालुका : भोस्ते - विजय कदम, गुणदे - राजू कदम, लोटे - अंकुश काते, धामणंद - कृष्णा लांबे, भरणे - संजना संजय भुवड, शिरवली - भाग्यश्री राजा बेलोसे, फुरुस - गणेश मोरे, चिंचघर - अपर्णा अनिल नकाशे, धामणदेवी - एस. के. आंब्रे, शिव - मोहसीन अल्वी, अस्तान - मुग्धा संजय भोसले, तळ्ये - अनिता अनिल खेराडे, पन्हाळजे - श्रुतिका संतोष हरवडे, सुसेरी - राखीव.
गुहागर तालुका - पडवे - पूर्वी प्रथमेश निमुणकर, खोडदे - राजेंद्र पंढरीनाथ साळवी, कोतळूक - सिद्धी संतोष सावंत, वेळणेश्वर - उदय यशवंत मोरे, अंजनवेल - सुरभी स्वप्नील भोसले, पालपेणे - सुनीता श्रीधर सांगले, पालशेत - नरेंद्र श्रीधर नार्वेकर, पाटपन्हाळे - संजय तात्याबा पवार.
लांजा तालुका - देवधे - मानसी सिद्धेश्वर आंबेकर, वेरवली बुद्रूक - श्रीकांत नाना कांबळे, प्रभानवल्ली - दीपाली संदीप दळवी, भांबेड - युगंधरा युवराज हांदे, वाकेड - अनिल तुकाराम कसबले, साटवली - राखीव, गवाणे - लक्ष्मण सोनू मोर्ये, खानवली - संजय वसंत नवाथे.
राजापूर तालुका - ओणी - वसंत धोंडू जड्यार, ओझर - विशाखा विश्वनाथ लाड, पाचल - राखीव, ताम्हाणे - अशोक रघुनाथ सक्रे, केळवली - प्रमिला प्रभाकर कानडे, कोंड्येतर्फे सौंदळ - करुणा कमलाकर कदम,कोदवली - राखीव, भालावली - अभिजीत जनार्दन तेली, साखरीनाटे - उन्नती सुभाष वाघरे, सागवे - अश्विनी शिवनेकर, देवाचेगोठणे व अणसुरे - येथील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.
चिपळूण तालुका - मालदोली - कृ ष्णा शिगवण, कोंढे - सुनील कृ ष्णा तटकरे, पेढे - ऋतुजा रुपेश पवार, नांदिवसे - राकेश पांडुरंग शिंदे, खेर्डी - अनिल धोंडीराम दाभोळकर, कापसाळ - सुप्रिया सुभाष जाधव, अलोरे - प्रताप गणपतराव शिंदे, ओवळी - धनश्री रवींद्र शिंदे, टेरव - दीपाली गंगाराम पवार, पोफळी - सुधीर जयसिंगराव शिंदे.
सावर्डे - रेश्मा दिनेश कदम, दहिवली बुद्रूक - शरद सखाराम शिगवण, रामपूर - अनुजा जितेंद्र चव्हाण, चिवेली - महादेव लक्ष्मण मोरे, कळंबट - संजीवनी संदीप खापरे, मुर्तवडे - संजीवनी संदीप जावळे, कोकरे - साक्षी संजय दळवी, कुटरे - शांताराम सखाराम नवेळे. (प्रतिनिधी)
बंडाळीमुळे शिवसेनेची सावध भूमिका
उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. ज्याठिकाणी एकापेक्षा जास्त प्रबळ दावेदार होते, त्याठिकाणी दुुफळी होऊ नये, म्हणून शिवसेनेने उमेदवारीचा निर्णय राखीव ठेवला आहे. रत्नागिरी तालुक्यात गोळप आणि पावस या गणांचा निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. मंडणगड व दापोली तालुक्यातील उमेदवारांची मात्र अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.