मी भविष्यवाणीवाला नाही! आमदार नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:57 PM2021-12-29T12:57:31+5:302021-12-29T13:04:09+5:30
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत नेमके काय होईल? असे पत्रकारांनी बुधवारी विचारले असता न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत बोलेन. मी काही भविष्यवाणीवाला नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
ओरोस येथील जिल्हा न्यायालयात आज, बुधवारी दुपारनंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्यायालयाच्या निकाला बाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकपूर्व जामीनाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. य़ावर आज सुमारे तीन-चार तास युक्तीवाद सुरु होता. हा युक्तीवाद पूर्ण झालेला नसल्याने उद्या पुन्हा युक्तीवाद होणार आहे.