राजकोट येथील पुतळा भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे द्या, पोलिस अधिकाऱ्यांची वैभव नाईकांना नोटीस; नोटीसला दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:19 PM2024-09-27T16:19:43+5:302024-09-27T16:20:17+5:30

कणकवली: मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी ...

Statue in Rajkot to provide evidence on corruption, notice to police officers MLA Vaibhav Naik | राजकोट येथील पुतळा भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे द्या, पोलिस अधिकाऱ्यांची वैभव नाईकांना नोटीस; नोटीसला दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

राजकोट येथील पुतळा भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे द्या, पोलिस अधिकाऱ्यांची वैभव नाईकांना नोटीस; नोटीसला दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

कणकवली: मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाऱ्यांवर केला आहे.त्या पार्श्वभूमीवर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी वैभव नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उपलब्ध पुरावे चार दिवसात सादर करून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी त्या नोटिसीला उत्तर दिले आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना इमेल केले आहे. 

या पत्रात म्हटले आहे कि, मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण माझ्याकडे माहिती मागविली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे काम नौदलाने केले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले आहे. मात्र, पुतळा सुशोभिकरण आणि नौदल दिनाचा खर्च अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग ,कणकवली यांनी २.५ कोटी रुपये, आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी ५.५ कोटी रुपये खर्च केला असल्याची लेखी माहिती मला संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नौदलाचे हे काम असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली, आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी केलेला खर्च कुठे गेला? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नौदल दिनानिमित्त नौसेनेने केलेल्या खर्चाचा तपशील देण्याबाबत नौसेना अधिकाऱ्यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. नौसेनेने अद्याप याबाबत माहिती दिलेली नसून नौसेनेकडून ती माहिती मिळताच त्याबाबतची माहिती आपल्याला देण्यात येईल. 

केलेल्या कारवाईची माहिती द्या

हा अत्यंत संवेदनशील विषय असून महाराष्ट्रात घडणाऱ्या अशा संवेदनशील विषयात पोलिस अधिकाऱ्यांकडून केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली जाते. मात्र,राजकोट पुतळा प्रकरणातील केलेला तपास, अटक केलेले आरोपी जयदीप आपटे, चेतन पाटील यांनी दिलेले जबाब, अन्य संशयित आरोपींना अटक कधी होणार ? याबाबत कोणतीच माहिती प्रसारमाध्यमांना आणि जनतेला आपण दिलेली नाही. त्या प्रकरणाबाबत केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती जनतेसाठी लवकरात लवकर जाहीर करावी. असेही वैभव नाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Statue in Rajkot to provide evidence on corruption, notice to police officers MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.