कदम, बने ‘शिवबंधनात’

By admin | Published: August 25, 2014 11:20 PM2014-08-25T23:20:38+5:302014-08-25T23:25:35+5:30

‘मातोश्री’वर झाला पक्षप्रवेश : उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

Step, becomes 'Shivbandh' | कदम, बने ‘शिवबंधनात’

कदम, बने ‘शिवबंधनात’

Next

देवरुख : माजी आमदार आणि कट्टर राणे समर्थक असलेले गणपत कदम आणि सुभाष बने यांनी अखेर स्वत:ला शिवबंधनात बद्ध करून घेतले. ‘मातोश्री’वर आज, सोमवारी झालेल्या एका छोटेखानी समारंभात या दोघांनीही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेना सोडून सुभाष बने आणि गणपत कदम यांनी २00५मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र काँग्रेसमध्ये पद नाहीच, उलट मानसन्मानही मिळत नसल्याचे या दोन्ही माजी आमदारांनी त्यांची नाराजी प्रगट करताना म्हटले होते. हे दोन्ही माजी आमदार कोणत्या पक्षात जाणार याबाबत कुतूहल होते. ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे आणि शिवसेनेतच प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वांत अगोदर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आज, सोमवारी ‘मातोश्री’ येथे या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही शिवबंधनात बद्ध केले आणि सुभाष बने यांनी भगवा ध्वज हातात धरला.
या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मुंबई कामगार सेनेचे उपाध्यक्ष सुनील चिटणीस, माजी महापौर दत्ता दळवी, नगरसेवक रमेश कोरगावकर, बेस्टचे माजी अध्यक्ष अशोक पाटील, पराग विद्यालयाचे संस्थापक बाळकृ ष्ण बने, पराग बने, रोहन बने, लांजा तालुकाध्यक्ष संदीप दळवी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

समर्थकही
काँग्रेस सोडणार
काँग्रेसमध्ये निराशा झाल्यानंतर बने आणि कदम यांचे समर्थक कार्यकर्तेही काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त आहे. हे दोन्ही माजी आमदार मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत असून, त्यानंतर ते समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.
माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर झालेल्या कार्यक्रमात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही शिवबंधनात बद्ध केले.

Web Title: Step, becomes 'Shivbandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.