कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 01:27 PM2022-01-08T13:27:53+5:302022-01-08T13:28:16+5:30

एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली आहे की अन्य कोणते कारण आहे. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

Stone throwing on ST bus at Kalsuli | कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक

कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक

Next

कणकवली : कणकवली एसटी आगारातून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कणकवली तालुक्यातील कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली. या घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

कणकवलीहून कळसुलीकडे निघालेल्या या बसवर आज, सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास कळसुली डोंगरी येथे ही दगडफेक झाली. यावेळी सुमारे ३० विद्यार्थी बस मध्ये होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. मात्र दगड बस चालकाच्या हाताला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. एसटीचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते.

दरम्यान, एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली आहे की अन्य कोणते कारण आहे. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

Web Title: Stone throwing on ST bus at Kalsuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.