कुडाळात महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:00 AM2018-01-04T01:00:53+5:302018-01-04T01:01:12+5:30

Stop the route to the Kudalah highway | कुडाळात महामार्गावर रास्ता रोको

कुडाळात महामार्गावर रास्ता रोको

Next


कुडाळ : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील महामार्गावर व शहरात जाणाºया राज्य मार्गावर भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी टायर जाळल्यामुळे महामार्ग तसेच कुडाळ शहरात जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. आंदोलन करणाºया सुमारे ६७ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कुडाळ वगळता जिल्ह्यात कुठेही बंदमुळे जाळपोळ अगर हिंसाचाराची कुठलीही घटना घडली नाही.
कणकवली आणि सावंतवाडीमध्ये भीमसैनिकांनी एकत्र येत मोर्चा काढून प्रांताधिकाºयांना निवेदन सादर केले. कणकवलीतील मोर्चा दरम्यान, महामार्गावर ठाण मांडून भीमसैनिकांनी काही काळ तो रोखून धरला होता.
कोरेगाव-भीमा येथील शौर्य दिनाला २०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन करायला आलेल्या लाखो अनुयायांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भीमसैनिकांच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्ग तसेच कुडाळ शहरातून वेंगुर्लेकडे जाणाºया कुडाळ शहरातील राज्य महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर जाळून भीमसैनिकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात विविध संघटना, मंडळांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग घेतला.
सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला हार अर्पण करून पुतळ््यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर जाळून भीमसैनिकांनी आंदोलन छेडले. त्यानंतर काही वेळातच येथील नवीन एसटी बस डेपोसमोरील मुंबई-गोवा महामार्गावरही रास्ता रोको करीत टायर जाळले. त्यामुळे महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोरेगाव-भीमा येथील घटनेचा व सरकारचा निषेध करणाºया घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनाची माहिती मिळताच काही वेळातच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी जात आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये विजयकुमार जाधव, विद्याधर कुडाळकर, विलास कुडाळकर, आत्माराम कुडाळकर, सुधीर कुडाळकर, जनार्दन कुडाळकर, नीतेश कुडाळकर, भूषण कुडाळकर, सशील केळुस्कर, संदेश मालवणकर, किरण कुडाळकर, कृष्णा तेंडोलकर, सत्यवान साठे, विक्रम कुडाळकर, तुषार कुडाळकर, विष्णू जाधव, भूपेश चेंदवणकर, देवीदास जाधव, बाबली जाधव, रामा जाधव, संतोष जाधव, दीपक नाईक, अंकुश कदम, भूपेश चेंदवणकर, विष्णू तेंडोलकर, अर्जुन वरावडेकर, राजन आंबेरकर, अनिल नेरूरकर, विशाल नेरूरकर, सागर कदम, दीपक नाईक, हरी कदम, अंकिता कदम, भगवान कदम, दीपक अणावकर, हरिश्चंद्र्र कदम, जनार्दन वर्देकर, बाबी भडगावकर, रामचंद्र्र कदम, आनंद जाधव, अमर पावसकर, आनंद पेंडूरकर, नाना नेरूरकर, सरोज जाधव, विशाखा कुडाळकर, सरिता कदम यांच्यासह ६७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात महिलांचाही समावेश होता.
जाळपोळ वगळता आंदोलन शांततेत पार पडले. संपूर्ण कुडाळ शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेष पोलीस पथक तसेच पोलीस अधिकारीही कुडाळमध्ये दाखल झाले होते.

आंदोलनकर्त्यांचा पोलिसांना चकवा
कुडाळमध्येच आंदोलनकर्त्यांनी दोन वेळा आंदोलन केले. मात्र, आंदोलनाची जराही कल्पना पोलिसांना लागू न देता पोलिसांना चकवा देत आंदोलन केले.

Web Title: Stop the route to the Kudalah highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.