चुकीची टीका थांबवा, अन्यथा वस्त्रहरण करावे लागेल!, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

By सुधीर राणे | Published: December 2, 2023 02:02 PM2023-12-02T14:02:17+5:302023-12-02T14:02:45+5:30

कणकवली: भाजप, संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे, अन्यथा त्यांच्या घरात जे महाभारत ...

Stop wrong criticism, otherwise you will have to strip, Nitesh Rane warning to Sanjay Raut | चुकीची टीका थांबवा, अन्यथा वस्त्रहरण करावे लागेल!, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

चुकीची टीका थांबवा, अन्यथा वस्त्रहरण करावे लागेल!, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

कणकवली: भाजप, संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे, अन्यथा त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे ते जगासमोर मांडून त्यांचे वस्त्रहरण करावे लागेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवली येथील निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. 

राणे म्हणाले, संजय राऊत यांच्या स्वतःच्या घराची अवस्था, भावाची अवस्था, त्यांच्या घरातील महाभारत आम्ही सांगितले तर काय होईल? याचा विचार त्यांनी करावा. ठाकरे व पवार कुटुंबियांत ज्या काड्या लावल्या त्यामुळे गलिच्छ राजकारण झाले आहे. या सर्वांचा मुख्य सूत्रधार  संजय राऊत हेच आहेत. भगव्याच्या नावाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राजकारण करीत आहेत.

संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाची होती अशी टीका केली आहे. भाजपाची नीती तालिबान सारखी असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला आहे. राऊत हे स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पायघड्या अंथरून होते. ते झाले नाही म्हणून ठाकरेंच्या सेनेत आणि पवार कुटुंबात त्यांनी काड्या लावल्या, आग लावली असल्याची टीका राणे यांनी केली.

मनोज जरांगेना कोणीही अटक करणार नाही. उगाच त्यांचे कान कोण भरत असेल तर ते त्यांनी ऐकू नये. आवश्यकता भासल्यास त्यांची बाजू सरकारकडे मी मांडेन. माझ्या रूपाने तुमचा भाऊ सरकारमध्ये आहे हे जरांगे पाटील यांनी लक्षात ठेवावे. मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून हिंदू समाजात वाद पेटवण्याचे काम काही जिहादी करत आहेत. त्याला आमच्यातील काही फितूर लोक मदत करत आहेत. राम मंदिर मुळे हिंदू एकत्र येतील अशी भीती असल्याने आमच्यातील गद्दारांना एकत्र घेऊन जिहादी वाद निर्माण करत आहेत.असा आरोपही नितेश राणे यावेळी केला.

Web Title: Stop wrong criticism, otherwise you will have to strip, Nitesh Rane warning to Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.