पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता, परराज्यातील नौका देवगड बंदराच्या आश्रयाला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 5, 2022 07:08 PM2022-09-05T19:08:20+5:302022-09-05T19:09:14+5:30

सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये, असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे.

Storm like conditions over West Konkan coast, foreign boats to shelter at Devgad port | पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता, परराज्यातील नौका देवगड बंदराच्या आश्रयाला

पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता, परराज्यातील नौका देवगड बंदराच्या आश्रयाला

Next

देवगड (सिंधुदुर्ग) : पश्चिम कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला आल्या आहेत.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्यावर पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नौकांनी देवगड बंदराकडे आपला मोर्चा वळवला आहे. 

गुजरात राज्यातील सुमारे ३० नौका देवगड बंदरात मुक्कामाला आल्या आहेत. त्याचपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच तमिळनाडूमधील नौका देवगड बंदरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंदर अधिकारी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा वादळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये, असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे.

Web Title: Storm like conditions over West Konkan coast, foreign boats to shelter at Devgad port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.