वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 05:27 PM2019-11-02T17:27:54+5:302019-11-02T17:29:18+5:30

महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

Stormlike conditions; The boat entered the port | वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल

समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने देवगड बंदरात नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

Next
ठळक मुद्देवादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखलमच्छिमारी व्यवसाय संकटात

देवगड : महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.
क्यार वादळ गेल्यानंतर आठ दिवसांतच महा चक्रीवादळाचे सावट समुद्रात निर्माण झाल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे.

हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या बहुतांशी नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच परप्रांतीय नौकांचाही समावेश आहे.

सध्या निर्माण झालेले वादळसदृश वातावरण चार दिवसानंतर निवळण्याची शक्यता आहे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या वादळसदृश वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून क्यार वादळामुळे शेतकऱ्यांबरोबर मच्छिमारांच्याही नुकसानीची पाहणी करून तातडीने मदत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा, असे मत स्थानिक मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Stormlike conditions; The boat entered the port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.