कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:47 PM2020-11-19T12:47:10+5:302020-11-19T12:50:02+5:30

dog, kankavli, muncipaltycarporation, sindhudurgnews कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आमचे नियोजन आहे . कणकवलीतील भटके कुत्रे पकडणार व त्या कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Stray dogs to be caught in Kankavali! Sameer Nalawade | कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे 

कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे 

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबविणार ! समीर नलावडे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही , त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल

कणकवली : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आमचे नियोजन आहे . कणकवलीतील भटके कुत्रे पकडणार व त्या कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अण्णा कोदे, प्रणाम कोदे, अजय गांगण,किशोर राणे व नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे,सतीश कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी समीर नलावडे म्हणाले, शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे . नगरपंचायत क्षेत्रात वाढलेल्या या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. यावर उपाय योजना करणार आहोत. ५ दिवसात संबधित कामाची निविदा काढली जाईल. तसेच शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल.

मोकाट भटक्या कुत्र्यांनी निल सावंत याचा चावा घेतला होता . त्याची मुख्याधिकारी यांना माहिती दिली आहे. यांनतर त्यांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही काही संस्थाशी संपर्क साधला आहे. त्यापैकी सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन नागपूर व अँनिमल फ्रेंड वेलफेअर पब्लिक सोसायटी ठाणे या दोन संस्था आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्या मदत करायला तयार आहेत.

नर जातींच्या कुत्र्यांना पकडल्यानंतर ५ दिवसानी व मादी जातीच्या कुत्र्यांना ७ दिवसानंतर टँग लावून सोडण्यात येणार आहे. या प्रक्रियमुळे किमान दोन वर्षात त्यांचा प्रतिसाद दिसेल. या कामासाठी शासनाचा दर असेल त्याप्रमाणे निविदा होईल. कमी दर असेल त्यांना निविदा दिली जाईल. संबधित संस्थेला नगरपंचायतच्यावतीने पाणी,शस्त्रक्रिया करण्यासाठी जागा , लाईट व्यवस्था यांची सोय उपलब्ध करण्यात येईल. भटक्या कुत्र्याची संख्या शहरात ५०० पेक्षा जास्त आहे.त्याचा ही सर्वे लवकरच केला जाईल. तसेच य सर्व प्रक्रियेसाठी आमदार नितेश राणे यांनी आपली जानवली येथील जागा देण्यास तयारी दर्शविली असल्याचेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.

मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करणार !

मोकाट जनावरे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. नरडवे रोडवर ती थांबतात तसेच तेथून ती चरण्यासाठी जातात. ती गुरे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची वेळीच काळजी घ्यावी. अन्यथा नगरपंचायतीला कारवाई करावी लागेल. असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Stray dogs to be caught in Kankavali! Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.