पथदिव्यांच्या बॅटºया चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:48 PM2017-08-09T23:48:38+5:302017-08-09T23:48:38+5:30

Street robber thieves arrested | पथदिव्यांच्या बॅटºया चोरांना अटक

पथदिव्यांच्या बॅटºया चोरांना अटक

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : सौरपथ दिव्यांच्या बॅटºया चोरणाºया कोल्हापुरातील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषणने सापळा रचून गजाआड केले. चोरलेल्या दोन बॅटºयांसह टेम्पोही उंबर्डे तिठ्यावर मंगळवारी रात्री ताब्यात घेतला.
नवनाथ गोरख दोरकर (वय २५), ज्ञानदेव दीपक सोनवले (२४, दोघेही रा. मल्हारपेठ कळे, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी आचिर्णे कडूवाडी आणि उंबर्डेतील चोरीची कबुली दिली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे वैभववाडीसह जिल्ह्यातील सौर पथदिव्यांच्या बॅटºयांच्या चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बॅटरी चोरट्यांचा टेम्पो उंबर्डे भुईबावडामार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक बापू खरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उंबर्डे तिठ्यावर मंगळवारी रात्री सापळा लावला होता. रात्री १२.३० च्या सुमारास एम. एच. ०९ सीयू-४०२९ या क्रमांकाचा छोटा मालवाहू टेम्पो स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला आढळून आला.
कोल्हापूरकडे निघालेला टेम्पो थांबवून चौकशी केली असता त्या दोघांनी आठवडा बाजारात भाजीचा धंदा करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजीच्या क्रेट्स पाहताना क्रेट्समध्ये लपविलेल्या दोन बॅटºया सापडल्या. त्यामुळे नवनाथ दोरकर आणि ज्ञानदेव सोनवले यांच्यासह टेम्पो ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला. त्यांची चौकशी करताना आचिर्णे कडूवाडी आणि उंबर्डेतील बॅटरी चोरीची त्यांनी कबुली दिली.
ते दोघे उन्हाळ्यात दुचाकीवरून गावागावांत फिरून आइस्क्रीम विक्री करतात. तसेच भंगार खरेदी आणि सध्या आठवडा बाजारात भाजीचा धंदा करीत होते. आइस्क्रीम विक्रीच्या निमित्ताने गावागावात फिरताना दिवसा टेहळणी करून कोल्हापूरला जाताना रात्री सौर पथदिव्यांच्या बॅटºया चोरण्याचा उद्योग ते करीत असावेत. त्यामुळेच करुळ येथे पोलीस तपासणी नाका असल्याने त्यांनी भुईबावडा घाटमार्ग निवडला असण्याची शक्यता आहे.

Web Title: Street robber thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.