पथदीपाची वायर जमिनीवर आहे पडून, शॉक लागून अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:04 AM2020-06-11T11:04:18+5:302020-06-11T11:05:45+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्राधिकरण प्रशासने या खुल्या अवस्थेत असलेल्या वायरकडे वेळीच लक्ष द्यावा, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांमधून केली जात आहेत.
सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्राधिकरण प्रशासने या खुल्या अवस्थेत असलेल्या वायरकडे वेळीच लक्ष द्यावा, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांमधून केली जात आहेत.
जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरीमध्ये असल्याने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेसह महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक आपल्या कामांसाठी या ठिकाणी येत असतात.
या ठिकाणी कामानिमित्त येणारे कर्मचारी आणि नागरिक आपली कामे झाल्यावर बससाठी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर उभे असतात. तर काही या रस्त्यावरून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांसाठी या रस्त्यावर पथदीपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या दोन कार्यालयांच्या मध्येच असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पथदीपाच्या खांबाची वायर तुटून जमिनीवर पडली आहे.
ही वायर रस्त्याच्या कडेलाच असल्याने यावर नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा पाय पडून अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर खुल्या अवस्थेत पडलेल्या पथदीप खांबाच्या वायरकडे प्राधिकरण् ने वेळीच लक्ष द्यावा आणि होणार संभाव्य अपघात टाळावा, अशी मागणी केली जात आहेत.