अग्निशमन दलास आधुनिक यंत्रणेचे बळ

By admin | Published: June 12, 2016 10:16 PM2016-06-12T22:16:45+5:302016-06-12T23:32:17+5:30

आपत्तीशी लढण्यास सज्ज : पालिकेच्या सहाही विभागांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

The strength of the modern system of fire brigade | अग्निशमन दलास आधुनिक यंत्रणेचे बळ

अग्निशमन दलास आधुनिक यंत्रणेचे बळ

Next

अझहर शेख  नाशिक
पूर, भूकंप, इमारत, घर, वाडे कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, शॉर्टसर्किट व अपघातांचे प्रमाण वाढणे अशा एक ना अनेक आपत्तींची भीती पावसाळ्यात अधिक वाढते. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा कृती आराखडा अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला असून, पालिकेच्या सहाही विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींशी दोन हात करण्यासाठी अग्निशमन विभागाचे अपुरे मनुष्यबळ अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारावर सज्ज झाले आहे. ‘अग्निशमन’च्या ताफ्यात सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर आलेला अत्याधुनिक ‘हॅजमॅट रेस्क्यू बंब’ हा अग्निशमन दलासाठी मोठा आधार आहे. शहर व परिसरातून गोदावरी, दारणा व नंदिनी (नासर्डी) या मुख्य नद्या वाहतात. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होते. म्हणून नद्यांच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे नद्यांचा जलस्तर वाढतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. या पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहे. महापालिकेच्या पूर्व, पंचवटी, पश्चिम, सातपूर, सिडको, नाशिकरोड अशा सहाही विभागांना पावसाळापूर्व उपाययोजना व कृती आराखडा अग्निशमन विभागाने पाठविला आहे.
आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्तांपासून तर थेट सर्वच विभागांच्या खातेनिहाय कामांचे वाटप करण्यात आले आहे. यानुसार महापालिकेच्या सहाही विभागांच्या विभागीय अधिकाऱ्यांनी भूयारी गटार, सार्वजनिक बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, उद्यान आदि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे निश्चित के ली आहेत. एकूणच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन तयार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अग्निशमन विभाग विविध यंत्रसामुग्रीने सज्ज झाला आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. संपूर्ण शहरात मुख्यालयासह उपकार्यालयांचे मिळून सात अधिकारी, ९८ फायरमन, लिडिंग फायरमन, २७ वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. पाण्याच्या बंबांच्या संख्येनुसार वाहनचालकांची संख्याही कमी आहे. १९९९ सालापासून अग्निशमन विभागात वाहनचालक किंवा फायरमन पदासाठी भरती झाली नसल्यामुळे सध्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन जरी यंत्रसामुग्रीने सुसज्ज असले तरी मनुष्यबळाने अपुरे आहे.

Web Title: The strength of the modern system of fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.