दोषींवर कडक कारवाई करावी

By Admin | Published: June 19, 2017 12:37 AM2017-06-19T00:37:49+5:302017-06-19T00:37:49+5:30

बांदा-देऊळवाडीतील महिलांचे निवेदन : इतर संशयितांना तत्काळ अटक करा

Strict action should be taken against guilty | दोषींवर कडक कारवाई करावी

दोषींवर कडक कारवाई करावी

googlenewsNext

बांदा : बांदा-देऊळवाडी येथील किशोरी सावंत यांच्या खुनातील मुख्य संशयित बाबा खान याला पोलिसांनी अटक केली असली तरी देऊळवाडी येथील महिला अजूनही दहशतीखाली आहेत. येथील महिला व ग्रामस्थांनी बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हे निदर्शनास आणून दिले. तसेच याप्रकरणात अन्य आरोपींना लवकरात लवकर अटक करा व नि:पक्षपाती या प्रकरणाचा तपास करून दोषी आरोपींना कडक शिक्षा होईल, अशी केस उभी करा अशी मागणी बांदा-देऊळवाडी येथील महिलांनी पोलिसांकडे केली. तसेच या प्रकरणाचा बांदा पोलिसांनी तत्काळ तपास करून मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक केल्याबद्दल बांदा पोलिसांचे अभिनंदनही केले.
बांदा-देऊळवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी रविवारी बांदा पोलीस स्थानकावर धडक देत पोलीस निरीक्षक यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रकरणामुळे आजही येथील महिला दहशतीखाली आहेत. देऊळवाडी येथील हा रस्ता निर्मनुष्य आहे. येथील महिला सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी जात असतात. तसेच अजूनही काही घरांमध्ये शौचालये नसल्याने याच माळरानावर महिला जात असतात. तसेच बाजारातून संध्याकाळच्यावेळी महिला आपल्या घरी याच रस्त्याने जात असतात. हे प्रकरण घडल्यापासून सकाळी व सायंकाळी येथील महिला घराबाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे मुख्य संशयित बाबा खान याच्याविरोधात भक्कम अशी केस तयार करा. यासाठी लागणारे सर्व सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाही देऊळवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.
बाबा खान याच्याबरोबरच अन्य काहींचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचा दाट संशय या महिलांनी व्यक्त केला. महिलावर्गातील ही भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी या निर्जन ठिकाणी गस्त घालावी. तसेच या माळरानावर काही व्यक्ती दारू पिण्यासाठी व इतर अवैध धंदे करण्यासाठी येत असतात. त्यासाठी या परिसरात नियमित तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी काही महिलांनी अटकेत असलेल्या बाबा खान याला या माळरानावर संशयास्पदरित्या फिरताना कित्येकवेळा पाहिल्याचे सांगितले. तसे आम्ही लिहून देण्यास तयार असल्याचीही सहमती दर्शविली. या घटनेमुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांची माहितीही पोलिसांनी करून घ्यावी असेही काही महिलांनी सांगितले.
बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले की, या खून प्रकरणातील मुख्य संशयित बाबा खान याला अटक करण्यात आली असली तरी आमचा तपास सुरुच आहे. या खून प्रकरणात त्याला आणखी कोणी मदत केली आहे का? त्याचे कोणाकोणाशी संपर्क होते? हा खून केवळ एकाच कारणासाठी झाला आहे का? याची माहिती त्याच्याकडून मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे. पण बाबा खान हा अट्टल गुन्हेगाराप्रमाणे आपले तोंड उघडत नसून तो कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आमचा संशय असल्याचे कळेकर यांनी ग्रामस्थांना सांगितले.
दरम्यान, काही ग्रामस्थांनी या खून प्रकरणात बाहेरील काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. बाबा खान याचे अवैध धंदे करणाऱ्यांशी संबंध असून अनेकवेळा स्थानिकांनी बाबा खान याला नजीकच्या गोवा राज्यातील काही लोकांबरोबर पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच या माळरानावर ओल्या पार्ट्या कायमच होत असतात. याकडेही पोलिसांचे लक्ष वेधले.
यावेळी रिना मोरजकर, निकिता मोरजकर, गजानन गायतोंडे, उमांगी मयेकर, रेश्मा सावंत, रमावती बांदेकर, आदिती सावंत, सुचिता मुळीक, सोनाली धारगळकर, सुगंधा कोरगांवकर, शिल्पा म्हाडगुत, सुवर्णा सावंत, स्नेहल राऊळ, सुषमा मुळ्ये, सुप्रिया धुरी, ऐश्वर्या सुपल, वृषाली मुळ्ये, वैशाली धुरी, राजश्री परब, जयश्री मुळ्ये, पल्लवी गवंडी, राजश्री टेंडले, दिगंबर गायतोंडे, संगीता म्हाडगुत, गीतांजली साळगावकर, आरती चव्हाण, अक्षय मयेकर, लक्ष्मी धुरी, राजश्री तारी, अमिता तारी, अनुजा तारी, परिमल सावंत, साईनाथ धारगळकर, निलेश मोरजकर, बबन धुरी, संदीप शेगडे, सुधीर साटेलकर, जगत बोगटी, महादेव शेगडे, दत्तप्रसाद गवंडे, युवराज वाळके, समीर सावंत, विनायक सावंत, राजन मुळ्ये, संदेश शेगडे, शांबा सावंत, नितीन धुरी, प्रथमेश साटेलकर, गोकुलदास साळगांवकर, प्रमोद धुरी, मनोज रेडकर, स्नेहल सुफल, आकाश सावंत, आशू सावंत, गौरव सावंत, अजय तारी, प्रसाद तारी, काका मुळ्ये, गौरांक साळगावकर, विना वडेर, जयेश म्हाडगुत, जावेद खतीब, दर्पण आळवे, सचिन नाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Strict action should be taken against guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.