सलग सातव्या दिवशी कडकडीत बंद, जनता कर्फ्यूचे नागरिकांकडूनही पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:09 PM2020-09-28T12:09:48+5:302020-09-28T12:14:00+5:30
कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांची शटरही डाऊन होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला कणकवलीवासीयांनी भरभरून साथ दिल्याचे दिसून येत आहे. बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयेही बंद असलेली दिसून येत होती. साहजिकच प्रशासकीय कामे आणि बँकांचे व्यवहारही बंद आहेत.
कणकवली : कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांची शटरही डाऊन होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला कणकवलीवासीयांनी भरभरून साथ दिल्याचे दिसून येत आहे. बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयेही बंद असलेली दिसून येत होती. साहजिकच प्रशासकीय कामे आणि बँकांचे व्यवहारही बंद आहेत.
कणकवली शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवस कणकवली बंदचा घेतलेला निर्णय कणकवलीकर काटेकोरपणे अमलात आणत आहे. शहरातील व्यापारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि ह्यकॉमन मॅनह्णच्या एकजुटीला सलग सातव्या दिवशीही कणकवलीत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
कणकवली शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरू असल्या तरीही नागरिकांकडूनही चांगल्याप्रकारे कर्फ्यूचे पालन केले गेल्याचे दिसून येत होते. नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सतत वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची यामुळे नागरिक सध्या चिंतेत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही उत्तम प्रतिसाद दिला आहे.
कर्फ्यूला प्रतिसाद
कणकवलीत गेले सात दिवस जनता कर्फ्यू असल्याने सर्व व्यवहारही ठप्प झाले होते. तसेच काही गावातही कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवली शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, नरडवे रोड, बाजारपेठ, डी. पी. रोडसह शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.