एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:23 PM2019-08-22T12:23:40+5:302019-08-22T12:26:16+5:30

कणकवली शहरात मुख्य चौक ते बेलवलकर ज्वेलर्सपर्यंत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणे, महामार्गावर व बाजारपेठेमध्ये हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना पूर्णपणे बंदी, महामार्गावर भाजी विक्रेत्यांना दोन बॅरिकेट्सच्या आतमध्ये बसविणे, नगरपंचायतीच्यावतीने नो पार्किंग झोन तयार करणे तसेच डी. पी. रोडवर चारचाकी वाहनांसाठी एका दिशेने पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

Strict implementation of a one-way route, starting on August 1st | एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात

एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात

Next
ठळक मुद्देएकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात समीर नलावडे यांची माहिती, कणकवली नगरपंचायतीमध्ये गणेशोत्सव नियोजन बैठक

कणकवली : कणकवली शहरात मुख्य चौक ते बेलवलकर ज्वेलर्सपर्यंत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणे, महामार्गावर व बाजारपेठेमध्ये हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना पूर्णपणे बंदी, महामार्गावर भाजी विक्रेत्यांना दोन बॅरिकेट्सच्या आतमध्ये बसविणे, नगरपंचायतीच्यावतीने नो पार्किंग झोन तयार करणे तसेच डी. पी. रोडवर चारचाकी वाहनांसाठी एका दिशेने पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

हॉटेल हॉर्नबिल व युको बँक या दोन ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येईल. असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून या नियोजनानुसार कणकवली शहरात २६ ऑगस्ट पासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली येथे नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीच्यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, वाहतूक शाखेचे निरीक्षक अरुण जाधव, विश्वजीत परब, नगरसेविका मेघा गांगण, बांधकाम समिती सभापती संजय कामतेकर, आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, महिला बालकल्याण समिती सभापती उर्मी जाधव, अभिजीत मुसळे, किशोर राणे व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल कामत, नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अबिद नाईक, रिक्षा संघटना प्रतिनिधी बाळा वरवडेकर, प्रभाकर कोरगावकर, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेण्यात आलेल्या निर्णयांची पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, कणकवली शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी चित्रमंदिर ते गांगोमंदिर हा नवीन डीपी रस्ता आचरा मार्गावरून येणाºया अवजड वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

रस्त्यांवर वाहनांचे अवास्तव पार्किंग करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील. तर हातगाडी व भाजी विक्रेते ठरवून दिलेल्या ठिकाणी न बसल्यास नगरपंचायत कारवाई करेल़. मुख्य चौकात दोन्ही रिक्षा स्टँड असलेल्या ठिकाणीच राहतील. मात्र, त्यांनी रांगेची शिस्त पाळावी. सहा आसनी रिक्षा पार्किंग व्यवस्था बसस्टँडसमोरील महामार्ग बॅरिकेट्सच्यामध्ये करण्यात येईल. रस्त्याच्या दुतर्फा दोरी ताणण्याबरोबरच पांढरे पट्टे मारण्यात येतील. आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत व्यापारी, नगरसेवक, नागरिकांनी विविध सूचना केल्या़ त्या सूचनांनुसार निर्णय होऊन अंतिम नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी नियोजनाबाबत काही सूचना केल्यास त्यांचा विचार करण्यात येईल. गणेशोत्सव कालावधीत नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे, असेही नगराध्यक्ष नलावडे यावेळी म्हणाले.

Web Title: Strict implementation of a one-way route, starting on August 1st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.