कृ षी विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Published: May 13, 2016 11:48 PM2016-05-13T23:48:52+5:302016-05-13T23:48:52+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसचे नेतृत्व : कृ षी पदविका विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी

Student's Front at Krishi University | कृ षी विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

कृ षी विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

Next

दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही जाचक अटी सरकारने लादल्या आहेत. त्या दूर कराव्या यासाठी दापोलीचे आमदार संजय कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, उपाध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता अजय बिरवटकर यांचे नेतृत्वाखाली दापोली कृषी विद्यापीठावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसने कृ षी विद्यापीठ प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन नियमानुसार कोणत्याही विषयाच्या लेखी अथवा प्रॅक्टिकल पेपरमध्ये प्रत्येकी २२ गुणांसह परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती अधिक आहे.
कृषी पदविका अभ्यासक्रम हा कठीण असून, लेखी व प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षांचे गुण मिळून उत्तीर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल लागण्यासाठीही ४५ दिवसांचा कालावधी लागतो. तो निकाल लवकर घोषीत करावा. कृषी तंत्रनिकेतन या ३ वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमाचा निकाल १६ टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थी एका व अर्ध्या गुणांनी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे एका गुणांनी नुकसान झाले आहे. त्यासाठी सप्लीमेंट परीक्षा घ्यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे १ वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना इबीसी स्कॉलरशिप मिळालेली नाही ती तत्काळ मिळावी, आदी मागण्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी केल्या.
स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य दिले जावे, तसेच कम्पार्टमेंट पासिंग सुरु करावे, विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्या, नवीन सत्रात शैक्षणिक शुल्कासाठी सवलत देऊन सुलभ हप्त्यामध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी दापोली कृषी विद्यापीठावर हा मोर्चा काढण्यात आला होता.
विद्यापीठावर काढलेल्या मोर्चावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, शैलेश कदम, राजेंद्र चौगुले, विजय मुंगशे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धोरण चुकीचे : कामगारांना न्याय देणार
कृ षी विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. विद्यापीठाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. सरकारचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे.
- संग्राम कोतेपाटील,
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस .
दापोली कृ षी विद्यापीठातील अनेक पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून, रोजंदारांचा विषय शासन दरबारी मांडू. पहिल्या टप्प्यातील कामगारांना कायम करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आपण वेळोवेळी आवाज उठविल्यानेच रोजंदारी मजुरांना न्याय मिळाला.
-संजय कदम, आमदार
आमदार उतरले...
विद्यापीठावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार संजय कदमही सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक होता.

Web Title: Student's Front at Krishi University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.