कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून केली मतदान जनजागृती 

By सुधीर राणे | Published: May 2, 2024 01:16 PM2024-05-02T13:16:07+5:302024-05-02T13:16:29+5:30

कणकवली: १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल, येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत ' ...

Students of Vidyamandir High School in Kankavli conducted voting awareness through human chain | कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून केली मतदान जनजागृती 

कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून केली मतदान जनजागृती 

कणकवली: १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल, येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत 'मतदान करा' अशी मानवी साखळी तयार करण्यात आली. ही मानवी साखळी लक्षवेधी ठरली.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कणकवली नगरपंचायत व कलाशिक्षक प्रसाद राणे यांच्या नियोजनातून शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. 

यानिमित्ताने शहरातील मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे व ७ मे रोजी आपला मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. यावेळी विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Students of Vidyamandir High School in Kankavli conducted voting awareness through human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.