सिंधुदुर्गमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम : गणेश रघुवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:26 PM2020-11-30T17:26:25+5:302020-11-30T17:27:45+5:30

fort, sindhudurgnews सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवणमधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला.

Study expedition for conservation of forts in Sindhudurg: Ganesh Raghuveer | सिंधुदुर्गमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम : गणेश रघुवीर

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम राबविणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसेवकांचे मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर यांनी स्वागत केले.

googlenewsNext
ठळक मुद्दे सिंधुदुर्गमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम : गणेश रघुवीर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा उपक्रम

मालवण : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवणमधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला.

किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांच्या पथकाने किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार, मंदिरे, विहिरी यांच्या संवर्धनासाठी आवश्यक ती माहिती संकलित केली.

या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे नितीन पानवलकर, विल्सन रॉड्रिक्स, विवेक गावडे, रोहन पुळासकर-सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सिद्धेश परब, केदार देसाई, भास्कर मसदेकर, अनिकेत चव्हाण, रूपेश मगर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, ॠतुराज खडपकर, अक्षय गावडे आदी दुर्गसेवक सहभागी होते.

किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर संवर्धन हवे

गणेश रघुवीर म्हणाले, सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेमार्फत आजपर्यंत विविध किल्ल्यांवर ९०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा तर १७०० अधिक दुर्गदर्शन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील गड किल्ल्यांवर संस्थेने अभ्यास मोहिमा राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर त्यांचे संवर्धन आपल्यालाच करावे लागणार आहे.
 

Web Title: Study expedition for conservation of forts in Sindhudurg: Ganesh Raghuveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.