सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा कन्याकुमारीला अभ्यास दौरा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 27, 2023 04:53 PM2023-02-27T16:53:13+5:302023-02-27T16:54:36+5:30

कुडाळ : अध्यात्मिक आणि  सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या दक्षिण भारतातील श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट, तिरूवत्तार कन्याकुमारी जिल्हा ...

Study tour of journalists from Sindhudurg district to Kanyakumari | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा कन्याकुमारीला अभ्यास दौरा

संग्रहीत छाया

googlenewsNext

कुडाळ : अध्यात्मिक आणि  सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या दक्षिण भारतातील श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट, तिरूवत्तार कन्याकुमारी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य अशी मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी कुडाळ  यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचा पाच दिवसाचा अभ्यास दौरा सोमवार पासून सुरू झाला आहे.

दौऱ्यामध्ये सिंधुदुर्गातीलपत्रकार कन्याकुमारी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट  यांचा नियोजित भव्य हनुमान मंदिर तथा मेडिटेशन सेंटरचा प्रकल्प, दक्षिण भारतातील अग्रगण्य अशा नामांकित शैक्षणिक संस्था, परफेक्ट अकॅडमीच्या दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शाखा यांना भेटी देणार आहेत.

परफेक्ट अकॅडमीच्यावतीने दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची जेईई , नीट एनडीए, एम एच टी सी इ टी, अशा परीक्षांची तयारी केली जाते. आतापर्यंत दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर तसेच १८०० हून अधिक विद्यार्थ्यांना, आयआयटी तथा एनआयटी मध्ये प्रवेश मिळाला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यातील विकसित शिक्षण पद्धती कोकणात देखील आणता यावी असा अकॅडमीचा मानस आहे.

श्री अंजनी या स्वामी स्पिरिट्युअल ट्रस्ट दक्षिण भारतातील प्रसिद्ध संस्था आहे. या दौऱ्याचा उपयोग केरळ तामिळनाडू येथील अध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी होईल, अशी माहिती अकॅडमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांनी दिली.

Web Title: Study tour of journalists from Sindhudurg district to Kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.