निधीचा गैरवापरावरून उपवनसंरक्षकांंना सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:24 PM2020-02-14T23:24:14+5:302020-02-14T23:26:31+5:30
वनमंत्र्यासमोर उपवनसंरक्षकांची खासदारांकडून हजेरी
सावंतवाडी: राज्यात वनविभागाला जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एकट्या सिंधुदुर्गला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आला आहे. या निधीचा वापर चांगल्या पध्दतीने करा अन्यथा तुम्ही सोन्या सारखी नोकरी गमावून बसाल. असा सज्जड दमच खासदार विनायक राउत यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या समोर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना दिला आहे. यापूर्वाेच्या वनअधिकाºयांच्या जेवढ्या तक्रारी आल्या नाहीत तेवढ्या तक्रारी माझ्याकडे आता आल्या आहेत. मी तुमची चौकशी करण्यासाठी पत्र दिले आहे. असेही राउत यांनी यावेळी सांगितले. यावेळी वनमंत्री राठोड यांनी तुमच्या पत्राप्रमाणे मी चौकशी करतो असे राउत यांना सांगितले.
सावंतवाडी विश्रामगृहावर खासदार विनायक राउत व अरुण दुधवडकर हे कार्यकर्त्याेच्या गाठी भेटी घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथे आंबोलीहून गोव्याकडे जाण्यासाठी वनमंत्री संजय राठोड आले होते. त्याच्या सोबत आमदार दीपक केसरकर हेही होते. तसेच उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आणि वन विभागाचे अधिकारी होते. सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते जंयत बरेगार यांनी सिंधुदुर्गमध्ये आरागिरणीच्या बाबत होत असलेला गैरप्रकार राउत यांना सांगितला.त्यानंतर राउत यांनी तुम्ही थांबा असे सांगत असे म्हणत असतनाच वनमंत्री राठोड हे च विश्रामगृहावर दाखल झाले.
यावेळी राउत यांनी सिंधुदुर्ग च्या वनपर्यटनाची माहीती तसेच तेजस ठाकरे यांनी आंबोली येथे येउन प्राण्याचा केलेला अभ्यास यांची माहीती राठोड यांना दिली.ही चर्चा सुरू असतनाच सिंधुदुर्ग मध्ये चांदा ते बांदा योजने तून मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला अधिकाºयांवर विश्वास ठेवला पण अधिकाºयांनी हा निधी योग्य पध्दतीने वापरला नाही असे राउत यांनी राठोड यांच्या निर्देशनास आणू दिले.
तसेच त्यानी यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची ही चांगलीच हजेरी घेतली निधीचा गैरवापर टाळा जर निधीचा चूकीचा वापर झाला तर आम्ही गप्प बसणार नाही.आम्ही मागील पाच वर्षात तुम्हाला विचारले नाही.पण आता तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत.या तक्रारी ची दखल घेणे मला भाग आहे.जर चुकीचे काम केला तर सोन्या सारखी मिळालेली नोकरी गमावून बसाल असे ही यावेळी राउत यांनी सांगितले.तसेच मी स्वता सर्व कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. असे यावेळी राठोड यांना सांगितले. राठोड यांनीही मी आपल्या पत्रा प्रमाणे चौकशी करतो असे सांगितले.
तसेच आडव्या आरा गिरण्याना परवानगी का दिली याचा ही जाब चव्हाण यांना विचारला तो माझा प्रश्न नाही. नागपूर कार्यालयाने दिला आहे.असे उत्तर चव्हाण यांनी दिले मग माझे पत्र घ्या आणि प्रस्ताव मागे घ्या असे ही राउत यांनी सांगितले.यावेळी बरेगार यांनी ही आपली तक्रार राउत यांना दिली.