मालमत्तेचे कायदेशीर अभिलेख सादर करा :प्रियदा साकोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:39 PM2021-02-18T14:39:38+5:302021-02-18T14:41:30+5:30

Banda Sindhudurgnews- बांदा शहरात १९८८ साली करण्यात आलेल्या सिटी सर्वेक्षण अंतर्गत सुमारे दोन हजारहून अधिक प्रॉपर्टी कार्ड नोंद करण्यात आली आहेत. याची सविस्तर यादी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. हे उतारे जमीन मालकांनी अद्ययावत करण्यासाठी वाढीव बांधकाम करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेचे कायदेशीर अभिलेख भूमी अभिलेख कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकोरे यांनी येथे केले.

Submit legal records of property: Priyada Sacore | मालमत्तेचे कायदेशीर अभिलेख सादर करा :प्रियदा साकोरे

बांदा ग्रामपंचायत कार्यालय येथे भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अक्रम खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते. (छाया : अजित दळवी)

Next
ठळक मुद्देमालमत्तेचे कायदेशीर अभिलेख सादर करा :प्रियदा साकोरे बांदा शहरात प्रॉपर्टीबाबत नागरिकांची बैठक

बांदा : बांदा शहरात १९८८ साली करण्यात आलेल्या सिटी सर्वेक्षण अंतर्गत सुमारे दोन हजारहून अधिक प्रॉपर्टी कार्ड नोंद करण्यात आली आहेत. याची सविस्तर यादी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. हे उतारे जमीन मालकांनी अद्ययावत करण्यासाठी वाढीव बांधकाम करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेचे कायदेशीर अभिलेख भूमी अभिलेख कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकोरे यांनी येथे केले.

यावेळी नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले. सिटी सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सरपंच अक्रम खान यांनी यावेळी सांगितले. बांदा शहरातील प्रॉपर्टी कार्ड अद्ययावत करण्यासाठी व ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भूमापक परीक्षक संजय पार्टे, भूकरमापक रवींद्र चव्हाण, सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, श्यामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, रिया आल्मेडा, प्रतीक्षा सावंत, अंकिता देसाई, अन्वर खान तसेच मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. बांदा शहरात यापूर्वी १९८८ साली सिटी सर्वेक्षण केले असून यासंदर्भात अद्ययावत माहिती अपडेट करण्यात आली नाही.

आठवड्यातून एक दिवस बांदा शहरासाठी

सिटी सर्वेक्षणअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व्हे नंबरमधील मालमत्तेचे उतारेच अद्ययावत होणार आहेत. याव्यतिरिक्त कोणत्याही नवीन मालमत्तांचा उतारा बनविण्यात येणार नाही. प्रॉपर्टी कार्ड संबंधित नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी यासाठी संपर्क अभियान राबविणे तसेच आठवड्यातून एक दिवस बांदा शहरातील नागरिकांना देण्याचे आश्वासन साकोरे यांनी यावेळी दिले.
सावंतवाडी तालुक्यात आतापर्यंत सावंतवाडी शहर, आजगाव, आरोंदा, तळवडे, कुंभारवाडा, आंबोली, बांदा येथे सिटी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

 

Web Title: Submit legal records of property: Priyada Sacore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.