सुब्रमण्यमच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक, बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:20 PM2020-08-14T18:20:03+5:302020-08-14T18:22:19+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
आचरा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सुब्रमण्यम केळकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाखाधिकारी श्रीकृष्ण माधव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपशाखाधिकारी जयलाल जे., कर्मचारीवर्ग, ग्रामस्थ बाबाजी भिसळे, प्रल्हाद चिंदरकर, खेडेकर कौस्तुभ केळकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविलेल्या सुब्रमण्यमचा नव्याने स्थापन झालेल्या मातृत्व आधार प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने त्याच्या चिंदर येथील राहत्या घरी जाऊन सत्कार करून आपल्या सेवाभावी संस्थेची सुरुवात केली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद उर्फ आप्पा चव्हाण, उपाध्यक्ष कृष्णा साळसकर, खजिनदार संतोष लुडबे, संचालक संतोष चव्हाण, विश्वास भोजने, विश्वास गावकर, मनोज खोबरेकर, राजन कुमठेकर, तपस्वी मयेकर आदी संचालक उपस्थित होते.
सुब्रमण्यम केळकर हा शिक्षण घेताघेता भिक्षुकी करीत होता. त्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाजी मारली आहे. आचरा, चिंदर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन त्याने यूपीएससीसारख्या अतिशय कठीण परीक्षेमध्ये मोठे यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता तो एक आदर्श ठरणार आहे.